Indian Idol 12: 'या' स्पर्धकाची तुलना ऋषी कपूर यांच्यासोबत; जया प्रदा म्हणाल्या...

शोमध्ये असलेले स्पर्धक आणि त्यांच्यात असलेल्या कलागुणांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  

Updated: Apr 25, 2021, 07:50 AM IST
Indian Idol 12: 'या' स्पर्धकाची तुलना ऋषी कपूर यांच्यासोबत; जया प्रदा म्हणाल्या... title=

मुंबई : टीव्ही विश्वातील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडल 12 (Indian Idol 12) दर्शकांच्या पसंतीस पडत आहे. शोमध्ये असलेले स्पर्धक आणि त्यांच्यात असलेल्या कलागुणांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  एखाद्या गाण्यावर त्यांनी केलेली मेहनत त्यांच्या सादरीकरणातून स्पष्टपणे झळकते. गेल्या काही आठवड्यांपासून स्पर्धकांचं मनोबळ वाढवण्यासाठी मंचावर अनेक मोठे कलाकार देखील हजेरी लावत आहेत. काही आठवड्यापूर्वी अभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा यांनी शोमध्ये हजेरी लावली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

यंदाच्या भागात प्रसिद्ध अभिनेत्री जाया प्रदा यांनी मंचावर दाखल होताचं स्पर्धक अत्यंत उत्साहित झाले . यावेळी स्पर्धकांनी जया प्रदा यांच्या सिनेविश्वातील जुन्या आठवणी ताज्या केल्या. नुकताच इन्स्टाग्रामवर एपिसोडचा एक टिझर पोस्ट केला. व्हिडिओमध्ये मोहम्मद दानिश ने 'दे दे प्यार दे' गाण्यावर धमाकेदार परफॉर्म करून जमलेल्याच्या आणि जाय प्रदा यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. 

मोहम्मद दानिशच्या सादरीकरणानंतर जया प्रदा यांनी दानिशचं भरभरून कौतुक केलं. महत्त्वाचं म्हणजे नितू कपूरनंतर जया प्रदा यांनी दानिशची  तुलना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर  (Rishi Kapoor) यांच्यासोबत केली. जया प्रदा यांनी यावेळी गायक बप्पी लहरी यांचं देखील कौतुक केलं.