कपिल शर्मा पुन्हा ट्विटरवर ट्रोल..हे आहे कारण

कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Mar 5, 2018, 07:57 AM IST
कपिल शर्मा पुन्हा ट्विटरवर ट्रोल..हे आहे कारण  title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

आपल्या नव्या वॅनिटी व्हॅनचा फोटो सोशल मीडियावर शेयर केल्याने तो पुन्हा चर्चेत आलाय.

हे फोटो जोरदार व्हायरल होऊ लागलेयत. पण आता कपिलला या फोटोवरून ट्रोल केलं जातयं.

सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्स फोटोखाली कमेंट्सवर कमेंट्स देत आहेत. तर बरेचजण वॅनिटी व्हॅन आणि कपिलच कौतुक करत आहेत.

कपिलने मानले आभार 

'या व्हॅनिटी व्हॅनसाठी डीसीचे आभार, नवी कार, नवा शो' या ओळी कपिलने फोटोसोबत लिहिल्या. पण युजर्सने आपआपल्या परीने यावर प्रतिक्रीया द्यायला सुरूवात केली.

दारू आहे ना ?

'कपिल, यामध्ये बार आहे ना ? दारू शिवाय तुझा शो कसा होणार ? आणि फेकून मारायला चप्पल पण सोबत ठेवं.' असे एका युजरने लिहिले.

टीआरपी कुठून आणणार ?

तर दुसऱ्याने लिहिले, 'नवी कार तर मिळाली पण नव्या शोला टीआरपी कुठून आणशील ? '

आणखी एक युजर फोटोखाली म्हणतो, 'कपिल तु यातुन खाली उतरणार कसा ? याचा गेट तर खूप लहान आहे.'

'सोनी'वर नवा 'शो'

तुम्हाला माहित असेल कपिल शर्मा खूप मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा येतोय. 'सोनी टीव्ही' वरील कपिल शर्माचा 'फॅमिली टाइम विथ कपिल' हा शो पाहायला मिळणार आहे.