मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत देशभरातील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय ७ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या धोकादायक विषाणूचा वाढता प्रकोप पाहता लोकांनी स्वत:ला घरात कैद करून ठेवलं आहे. तर दुसरीकडे काही बेजबाबदार नागरिक अद्यापही घराबाहेर मोकाट फिरताना दिसत आहेत. प्रत्येक जागृत नागरिकाला देशाप्रती चिंता वाटत आहे. आता हे वर्ष कसं जाईल असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना गंमतीत एक प्रश्न विचारला आहे.
T 3484 - " Can we please delete the 2020 year and then reinstall it anew ?
This version is with virus !— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 29, 2020
'आपण २०२० हे वर्ष डिलीट करू शकतो का आणि पुन्हा इंस्टॉल करू शकतो का?' यंदाच्या वर्षात व्हायरस आहे अशी गंमत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. बिग बींच्या या पोस्टवर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. शिवाय अनेक गोष्टी पोस्ट करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीसाठी आवाहन केले होते. त्यानंतर तात्काळ अनेक दिग्गज मदतीसाठी पुढे आले, तेव्हा तुम्ही कोरोनाग्रस्तांसाठी काही मदत केली का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, 'अनेकांनी मदत केली आहे. काहींची नावे समोर आलीत तर काहींची नाही.' तेव्हा मी दुसऱ्या पर्यायात मोडतो असं वक्तव्य त्यांनी केलं.