टॉपलेस फोटो शेअर प्रसिद्ध गायिकेनं दिली गुडन्यूज?

ही सिंगर घेतेय तिच्या मोकळ्या आयुष्याचा खूप आनंद 

Updated: Aug 18, 2021, 05:59 PM IST
टॉपलेस फोटो शेअर प्रसिद्ध गायिकेनं दिली गुडन्यूज? title=

मुंबई : अलीकडेच तिच्या वडिलांसोबत संपलेल्या कायदेशीर वादानंतर हॉलिवूड अभिनेत्री सिंगर ब्रिटनी स्पीयर्स खूप आनंदी आहे. दरम्यान, आता ब्रिटनीच्या काही फोटोंमुळे नवीन अटकळांना चालना मिळाली आहे. ब्रिटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती टॉपलेस दिसत आहे. फोटो खूपच बोल्ड आहेत. ब्रिटनीची हे फोटो पाहून तिचे चाहते गायिका ब्रिटनी प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधत आहेत.

मात्र, ब्रिटनी स्पीयर्सने या बातम्यांना जास्त आकर्षण मिळू दिलं नाही आणि तिच्या गर्भधारणेच्या बातमीवर तिचं मौन तोडले. ब्रिटनी स्पीयर्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की,  नाही, मी गर्भवती नाही. मी तुम्हाला माझ्या शरीराची आणखी काही फोटो दाखवते... मला वाटतंय की, तुम्ही माझ्याद्वारे माझ्या स्किनला माझी बॉडी  उघड करणे याबद्दल माझे विचार समजून घ्या अशी माझी इच्छा आहे. इथे ब्रिटनी 'एक्सपोजिंग स्किन' या विषयावर बोलत होती.

तिने पुढे लिहिलं की,  माझ्या मते, जेव्हा कोणी एक महिला असते आणि ती एकापाठोपाठ एक थर काढून टाकते, तेव्हा एक बदल येतो... नाही, मी इथे स्ट्रिप क्लब किंवा कोणत्याही प्रात्यक्षिकाबद्दल बोलत नाही. ब्रिटनी फक्त महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे. तिच्याच शब्दात, तिने अनेक वळण -वळणात सांगितलं आहे, पण आता ती तिच्या मोकळ्या आयुष्याचा खूप आनंद घेत आहे.