श्रीदेवींंसाठी बोनी कपूर जान्हवी आणि खुशीसह जाणार हरिद्वारला

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दुबईच्या हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे तिच्या चाहत्यांना, बॉलिवूडला आणि कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. 

Updated: Mar 7, 2018, 05:46 PM IST
श्रीदेवींंसाठी बोनी कपूर जान्हवी आणि खुशीसह जाणार हरिद्वारला  title=

मुंबई : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवीने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दुबईच्या हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवींच्या अकाली निधनामुळे तिच्या चाहत्यांना, बॉलिवूडला आणि कपूर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. 

जान्हवीने सेलिब्रेट केला 21 वा वाढदिवस   

श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरने 6 मार्चला 21 वा वाढदिवस साजरा केला. यादिवशी श्रीदेवींच्या इच्छेप्रमाणे जान्हवी वृद्धालयात गेली होती. तिथल्या लोकांसोबत साध्या वातावरणात जान्हवीने वाढदिवस साजरा केला. त्यानंतर रात्री घरी देखील कपूर कुटुंबीयांनी खास सेलिब्रेशन आयोजित केलं होतं.  

जान्हवी, खुशी हरिद्वारला जाणार 

जान्हवी  कपूर आणि खुशी कपूर श्रीदेवींच्या निधनानंतर खंबीरपणे उभ्या राहत आहे. 4 मार्च रोजी रामेश्वरम येथे श्रीदेवींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आता श्रीदेवींसाठी प्रार्थना करण्यासाठी बोनी कपूरसह त्यांच्या मुली हरिद्वारला जाणार आहेत.  श्रीदेवींच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.