'महाभारत'वर आमीर खानला बनवायचाय सिनेमा, पण म्हणतो या गोष्टीची वाटतेय भीती

आमिरने सांगितलं कि महाभारतासारख्या महाकाव्यावर सिनेमा करणं म्हणजे एक यज्ञ करण्यासारखं आहे.

Updated: Aug 8, 2022, 07:23 PM IST
'महाभारत'वर आमीर खानला बनवायचाय सिनेमा, पण म्हणतो या गोष्टीची वाटतेय भीती title=

Aamir khan on Mahabharat:  बॉलीवूड स्टार आमिर खान सध्या लाल सिंग चड्ढा सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. हे तर सर्वांना माहित आहे.आमिर खान(Aamir khan) केवळ सिलेक्टिव्ह सिनेमेच करतो आणि म्हणूनच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटलं जातं . नुकतंच एका मुलाखतीमध्ये आमिर खान ने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टविषयी चर्चा केलीये. आमिर खानला पौराणिक कथेवर एक चित्रपट करायची इच्छा आहे आणि ही पौराणिक कथा आहे महाभारत.. पण महाभारतवर सिनेमा करायचा तर त्याला एक भीती वाटतेय आणि यावेळी आमिरने त्याच्या भीतीच कारण सुद्धा सांगितलं आहे. 

हे आहे भीतीच कारण 

मुलाखती दरम्यान आमिरने सांगितलं कि महाभारतासारख्या महाकाव्यावर सिनेमा करणं म्हणजे एक यज्ञ करण्यासारखं आहे.आमीर अजून यासाठी तयार नाहीये. महाभारत तुम्हाला कधीच निराश करणार नाही मात्र जर आपण या सिनेमाला न्याय देऊ शकलो नाही तर मात्र आपण महाभारतासारख्या महाकाव्याचा अपमान करू असं त्याला वाटतंय   

5 वर्ष केवळ रिसर्च (RESEARCH) साठी लागतील

महाभारत हा आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं तो म्हणतो यावर सिनेमा बनवायची इच्छा आहे मात्र हा एक मोठा प्रोजेक्ट असेल जर आज बनवायला घेतला तर 20 वर्ष लागतील तो पूर्ण व्हायला असं तो म्हणतोय पुढे आमिर म्हणतो कि जर त्याला हा प्रोजेक्ट करायचा असेल तर रिसर्चसाठीच पाच वर्ष जातील त्यामुळे सध्यातरी आमिर खानला हा सिनेमा हातात घ्यायचा नाहीये असं त्याच म्हणणं आहे.