अभिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची सर्जरी, ट्विट करुन सर्जरीच्या अनुभवाविषयी म्हणाले....

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या डोळ्याची सर्जरी करण्यात आली आहे.

Updated: Mar 15, 2021, 03:35 PM IST
अभिताभ बच्चन यांच्या डोळ्यांची सर्जरी, ट्विट करुन सर्जरीच्या अनुभवाविषयी म्हणाले.... title=

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या डोळ्याची सर्जरी करण्यात आली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना, दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती दिली आहे. बीग बी कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया करतायेत, याबद्दल त्यांच्या चाहत्यांना त्यांची काळाजी वाटत होती. मात्र, 'काळजी करु नये माझी तब्बेत चांगली आहे'. असं बीग बी ट्विट करत म्हणाले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन झालेल्या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली आहे, ''माझी तब्बेत सुधारत आहे. दुसर्‍या डोळ्याची शस्त्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आता मी बरा होत आहे. सर्व ठीक आहे''. हा टप्पा जीवन बदलून टाकणारा अनुभव आहे'' अश्या आशयाचं ट्विट बीग बी यांनी केलं आहे.

यापूर्वीही आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी केलेल्या शस्त्रक्रियेचा उल्लेख केला होता. शस्त्रक्रियेद्वारे आपण एक नवीन आणि सुंदर जग पाहण्यास तयार आहोत. असही त्यांनी ब्लॉगमधून सांगितलं. अतिशय वेगळा अनुभव म्हणून त्यांनी वर्णन केलं.

कोणत्याही कारणास्तव शस्त्रक्रिया करण्यास उशीर करु नका, थोडा विलंब कोणत्याही व्यक्तीस पूर्णपणे आंधळा बनवू शकतो. "मी सल्ला देईन की तुम्हाला समस्या असल्यास शस्त्रक्रिया वेळेत करायला हवी." असेही त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे

अमिताभ यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. "तुमच्यावर खूप प्रेम आणि आपुलकी आहे. तुम्ही माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करता हे ऐकून मी खूप भावूक झालो." अशा आशयाचं कॅप्शन बीग बींनी दिलं आहे.