कोरोना काळातली गौहर- जैदची अनोखी लव्हस्टोरी Watch Video

कोरोनाकाळात मला सापडलं माझं प्रेम.....

Updated: Mar 15, 2021, 02:46 PM IST
कोरोना काळातली गौहर- जैदची अनोखी लव्हस्टोरी Watch Video  title=

मुंबई : गौहर खान (Gauhar Khan)  आणि जैद दरबार (Zaid Darbar)  यांच्या लग्नाची आजही जोरदार चर्चा होतेय. या दोघांनी 25 डिसेंबर रोजी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ८ मिनिटं ४० सेकंदाच्या या व्हिडिओत त्यांची लव्हस्टोरी सांगण्यात आली आहे. गौहरने हा व्हिडिओ शेअर करताना वडिलांची आठवण काढली आहे. 

ट्विटरवर हा व्हि़डिओ शेअर करताना लिहिलं आहे की,'माझं स्वप्न साकार झालं. नशिबवान समजते स्वतःला कारण माझे वडिल तेव्हा होते. आमच्या लग्नाचा व्हिडिओ पाहा.... GAZA Wedding Movie' या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला कनिष्क सेठचं गाणं 'आने को है ख्वाब' आणि 'मन कुन्तो मौला' सारखी कव्वाली वाजत आहे. या व्हिडिओत गौहर आणि जैद आपली लव्हस्टोरी देखील सांगत आहेत. 

अशी आहे गौहर-जैदची लव्हस्टोरी 

कोरोनाचा काळात हा सगळ्यांसाठी कठीण काळ होता. मात्र हा काळ गौहर आणि जैदसाठी अत्यंत सुखाचा होता. जैदने गौहरला Nature Basket मध्ये पाहिलं होतं. तिथेच त्याला गौहरबद्दल खास भावना वाटू लागली. त्याने गौहरसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केली. गौहरला इंस्टाग्रामवर मॅसेज करून त्यांच्यात ओळख वाढवली. त्यानंतर दोघांत मैत्री झाली. त्यानंतर त्याचं रुपांतर प्रेमात होत गेलं. गौहर आणि जैदरची पहिली भेट ही एका एटीएममध्ये झाली. त्यानंतर या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

जैदला भेटून गौहरला असं वाटलं की,'हाच माझ्या आयुष्यातील खास माणूस आहे. आम्ही एकमेकांसारखेच आहोत, असं वाटतं.'