पाहा 'या' Bollywood Celebs ना चाहत्यांमध्येच भेटले आयुष्यभराचे जोडीदार

कलाजगतातील जोडीदाराऐवजी या कलाकारांनी दिली खास व्यक्तींना पसंती   

Updated: Sep 30, 2021, 02:33 PM IST
पाहा 'या' Bollywood Celebs ना चाहत्यांमध्येच भेटले आयुष्यभराचे जोडीदार title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे जोडीदार चाहत्यांसाठी कायमच एक कुतूहलाचा विषय. सेलिब्रिटी कोणताही असो, त्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान नेमकं कुणाचं, त्यांचा जोडीदार कोण हे असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. तुम्हाला माहितीये का, हिंदी चित्रपट जगतामध्ये आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांची अर्थात फॅन्सची निवड जोडीदार म्हणून केली आहे. 

यामध्ये दिलीप कुमार यांच्यापासून विवेक ओबेरॉयच्या नावाचा समावेश आहे. दिलीप कुमार हे सायरा बानो यांचे बालपणापासूनचे क्रश. वयाच्या 44 व्या वर्षी त्यांनी सायरा यांच्याशी एका नव्या नात्याची सुरुवात केली. लग्नाच्या वेळी सायरा बानो यांचं वय 22 वर्षे इतकं होतं. 

Dilip Kumar And Saira Banu

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिनंही भरत तख्तानी या आपल्या चाहत्याशीच लग्नगाठ बांधली होती. शालेय दिवसांपासूनच भरतला ईशा आवडायची. 

Dilip Kumar And Saira Banu

अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या त्या काळच्या सुपरस्टार जितेंद्र यांच्या चाहत्यांच्या यादीत असंच एक नाव होतं. हे नाव म्हणजे ब्रिटीश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या शोभा या एअरहॉस्टेसचं. अवघ्या दोन भेटींमध्येच हे दोघंही प्रेमात पडले आणि 1974 मध्ये लग्नगाठ बांधली. 

Jitendra And Shobha

मुमताज यांनीही मयूर वाधवानी या आपल्या चाहत्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

Mumtaz and Mayur Madhwani

राज कुंद्रा सध्या अश्लील व्हिडीओ प्रकरणी चर्चेत असला तरीही शिल्पासोबतचं त्याचं नातंही कायम सर्वांचं लक्ष वेधून गेलं. तोसुद्धा शिल्पाच्या असंख्य चाहत्यांपैकी एक होता. 2009 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Shilpa Shetty And Raj Kundra 

विवेक ओबेरॉच्या चाहत्यांच्या यादीत कर्नाटकच्या एका नेत्याची मुलकी प्रियंका अल्वा हिच्या नावाचा समावेश होता. प्रियंकाचं विवेकवर असणारं प्रेम आणि या दोघांचं नातं कुटुंबीयांपर्यंत पोहोचलं आणि दोघांच्या कुटुंबांच्या सहमतीनं 2010 मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली. 

Vivek Oberoi And Priyanka Alva