दुर्गापूजेच्या निमित्ताने 'कभी खुशी कभी गम'चं कुटुंब एकत्र आलं आणि....

पाहा सेलिब्रिटींची दुर्गापूजा... 

Updated: Oct 7, 2019, 08:31 AM IST
दुर्गापूजेच्या निमित्ताने 'कभी खुशी कभी गम'चं कुटुंब एकत्र आलं आणि....  title=
दुर्गापूजेच्या निमित्ताने 'कभी खुशी कभी गम'च कुटुंब एकत्र आलं आणि....

मुंबई : नवरात्रोत्सवादरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने मुंबईतीच एका दुर्गापूजा मंडपात बॉलिवूड सेलिब्रिटी मंडळींची गर्दी पाहायला मिळाली. दिग्गज कलाकारांपासून नव्या जोमाच्या कलाकारांनी यावेळी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी आणि ज्येष्ट अभिनेत्री जया बच्चन यांनी दुर्गापूजेसाठी उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनीसुद्धा बिग बींसह दुर्गापूजेचा आनंद घेतला. मुख्य म्हणजे बिग बी आणि त्यांच्यासोबत जया बच्चन, काजोल, राणी मुखर्जी यांना पाहताना जणू काही 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील एखादं दृश्यंच पाहत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली. 

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटामध्ये या कलाकारांनी साकारलेल्या भूमिका, त्यातून एकत्र कुटुंबपद्धती, वडीलधाऱ्यांचा आदर या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा एकदा चाहत्यांना त्याचीच आठवण झाली. 

दुर्गापूजेसाठी आलेल्या राणी मुखर्जी, काजोल आणि जया बच्चन यांनी पारंपरिक वेशभूषेला पसंती दिली होती. या तिघींच्याही सुरेख साड्यांनी सर्वाचं लक्ष वेधलं होतं. तर, बिग बी नेहमीप्रमाणेच साजेशा अशा सदरा आणि शाल यांमध्ये शोभून दिसत होते. 

दुर्गाष्टमीच्यचा निमित्ताने मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दुर्गापूजा मंडपांमध्ये सेलिब्रिटी आणि सामान्यांचीही गर्दी पाहायला मिळाली. त्यातही रविराच्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथे गर्दी पाहायला मिळाली होती. दुर्गाष्टमीच्या दिवसानंतर आता नवमीच्या दिवशीही अशाच प्रकारचा उत्साह पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये पुन्हा एकदा कलाकार मंडळीसुद्धा देवीच्या आराधनेसाठी विविध ठिकाणी या दुर्गापूजेसाठी हजर राहणार आहेत.