Kaun Banega Crorepati : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा चौदावा (KBC 14) हंगाम सुरु झाला आहे. अगदी पहिल्या हंगामापासून बिग बी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. तिसऱ्या पर्वात शाहरुख खाने (Shahrukh Khan) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. पण प्रेक्षकांना ते फारसं रुपचलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांनी सूत्र हाती घेतली. गेल्या तेरा वर्षांपासून कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातून अनेकजण लखपती, करोडपती झाले.
या कार्यक्रमात अमिताभ बच्चन स्पर्धकांना केवळ प्रश्नच करत नाहीत तर त्यांच्या आयुष्याशी संबंधित किस्सेही शेअर करतात. अनेकवेळा स्पर्धकांसोबत त्यांच्या आयुष्याशी संबंधित मजेशीर किस्से शेअर करणारे बिग बी यांच्याबाबतीत असाच एक मजेशीर किस्सा घडला.
अमिताभ बच्चन यांनाच आलं नाही प्रश्नाचं उत्तर
कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात कानपूरमध्ये (Kanpur) रहाणारे ऋषी राजपूत सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऋषी राजपूत यांनी अमिताभ बच्चन यांनाच एक प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकून अमिताभ बच्चन गोंधळात पडले. ऋषी राजपूत यांनी अमिताभ बच्चन यांना तुम्हाला मोमोस (Momo's) खायला आवडतात का असा प्रश्न विचारला.
यावर अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर प्रश्न उपस्थित झाला. त्यांनी ऋषिकेश यांनाच मोमो म्हणजे काय असा प्रतिप्रश्न केला. यानंतर ऋषिकेश यांनी अमिताभ बच्चन यांना मोमोस बद्दल सर्व माहिती दिली. ऋषिकेश यांनी अमिताभ यांना तुम्हाला कोणतं फास्टफूड आवडतं असं विचारल्यावर अमिताभ बच्चन यांनी मोठ्या अभिमानाने आपल्याला वडापाव खूप आवडत असल्याचं सांगितलं. पूर्ण आयुष्य वडापाव खाऊ शकतो असंही अमिताभ यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात ऋषिकेश 50 लाख रुपये जिंकला. या आनंदाच्या क्षणी अमिताभ यांनी चक्क त्याला वडापाव खायला दिला. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणातही आपण आज वडापावच खाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वडापावची किंमत कमी असते आणि चवीलाही स्वादिष्ट असतो, महत्ताचं म्हणजे त्याने पोट भरतं. त्यामुळे वडापाव आपला मनपसंद पदार्थ असल्याचं अमिताभ यांनी सांगितलं.