प्रेयसीच्या गरोदरपणाविषयी माहिती मिळताच अशी होती मुलींची प्रतिक्रिया; अर्जुनचा खुलासा

अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिला सध्या त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. 

Updated: May 27, 2019, 10:23 AM IST
प्रेयसीच्या गरोदरपणाविषयी माहिती मिळताच अशी होती मुलींची प्रतिक्रिया; अर्जुनचा खुलासा  title=

मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिला डेमेट्रिएड्स सध्या त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने त्याच्या आणि गॅब्रिलाच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या पाहुण्याविषयी सर्वांनाच माहिती दिली. अर्जुनचं हे नातं आणि त्याच्या पालकत्वाविषयीची ही माहिती मिळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अर्जुनला याआधी मेहेर जेसिया हिच्यासोबतच्या लग्नातून माहिका (१७) आणि मायरा (१३) अशा दोन मुली आहेत. ज्यावेळी त्याच्या या मुलींना अर्जुनच्या प्रेयसीच्या गरोदरपणाविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा त्यानेच केला आहे. 

'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीतत त्याने आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या वळणाविषयी माहिती दिली. ज्या मुलाखतीत त्याने गॅब्रिलासोबतचं त्याचं नातंही सर्वांसमोर ठेवलं. 'आम्ही काही मित्रांमुळे भेटलो होतो. तिच्याविषयी काय सांगू, की ती मला न्याहाळत होती? आम्ही एकत्र येऊन फक्त एकच वर्ष झालं आहे आणि आज आम्ही इथवर पोहोचलो आहोत', असं अर्जुन म्हणाला. या साऱ्यामध्ये आपल्या मुलींनी गॅब्रिलाचा स्वीकार करणंही तितकच महत्त्वाचं असल्याची बाब त्याने समोर ठेवली. तिसुद्धा कुटुंबाचाच एक भाग असल्याचं त्यांनी स्वीकारणं महत्त्वाचं होतं आणि कोणत्याची प्रतिप्रश्नाशिवाय त्यांनी ही गोष्ट स्वीकारल्यामुळे आपण स्वत:ला नशिबवान समजत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. 

 
 
 
 

A post shared by Arjun (@rampal72) on

गॅब्रिला ही दक्षिण आफ्रिकन मॉडेल आणि अर्जुन त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या नात्याचा हा त्रिकोण पूर्ण होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हे दोघं त्यांच्या नात्याची सुरेख बाजू सर्वांसमोर ठेवत असतात. सध्याच्या घडीला चित्रपट विश्वातही या जोडीची चर्चा सुरु आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x