ना उम्र की सीमा हो.... गर्लफ्रेंड वयानं मोठी, पाहा काय म्हणतोय अर्जुन कपूर

मलायकावरील प्रेमाची कबुली 

Updated: Jan 4, 2022, 03:25 PM IST
ना उम्र की सीमा हो.... गर्लफ्रेंड वयानं मोठी, पाहा काय म्हणतोय अर्जुन कपूर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांच्या नात्याटी बरीच चर्चा पाहायला मिळते. अर्जुननं कायमच अगदी मोकळेपणानं मलायकावरील प्रेमाची कबुली दिली आहे. 

मलायकानंही तिच्या आयुष्यातील या 'हँडसम हंक'वरील प्रेमाची अनेकदा कबुली दिली आहे.

मुख्य म्हणजे मलायका आणि अर्जुननं एक जोडी म्हणून कायम एकमेकांना साथ दिली असली तरीही त्यांच्या या नात्यावर निशाणा साधणारेही अनेक आहेत. 

वयात असणाऱ्या फरकामुळं त्यांची खिल्ली उडवली जात आहे. अर्जुन 36 वर्षांचा आहे, तर मलायकाचं वय आहे 48 वर्षे. 

तसं पाहिलं तर, या दोघांमध्येही 12 वर्षांचं अंतर आहे. ज्या मुद्द्यावरुन त्यांची खिल्लीही उडवली गेली आहे. 

अखेर अर्जुन कपूरनं त्यांच्या नात्याची थट्टा करणाऱ्यांना धारेवर धरलं आहे. 

'माध्यमंच लोकांच्या या प्रतिक्रियांवर लक्ष देतात. आम्ही तर 90 टक्के प्रतिक्रियांकडे लक्षही देत नाही. बरं, आता खिल्ली उडवणारी हीच मंडळी भेटल्यावर सेल्फी काढण्यासाठी येणार. 

हे सर्व बालिश आहे', असं म्हणत अर्जुननं त्याच्या नात्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांना सुनावलं. 

प्रेम करताना अनेकदा काही गोष्टींना तिलांजली दिली जाते. अर्जुन आणि मलायकाच्या नात्यात वयातील अंतर तसंच काहीसं आहे. 

'ना उम्र की सीमा हो' असं म्हणत ही जोडी सध्या त्यांच्या नात्यातील गोडवा अनुभवत आहे, असंच म्हणावं लागेल.