ताऱ्यांमध्ये विलीन झाली बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीवर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Updated: Feb 28, 2018, 06:03 PM IST
ताऱ्यांमध्ये विलीन झाली बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीवर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बोनी कपूरसह मुली जान्हवी आणि खुशीने श्रीदेवीला मुखाग्नी दिलाय. यावेळी बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली होती. 

शनिवारी श्रीदेवीचं दुबई एका हॉटेलमध्ये निधन झालं होतं. त्यानंतर तब्बल ७२ तासांनी श्रीदेवीचं पार्थिव मुंबई आणण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी ९.३० वाजेपासून ते १२.३० वाजेपर्यंत श्रीदेवीचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्या चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. 

अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, शाहरूख खान, अर्जुन रामपाल, विद्या बालन, अनिल अंबानी, आदित्य कपूर, फरहान अख्तर तसेच कपूर परीवारातील सर्वचजण इथे उपस्थित आहेत. श्रीदेवीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे तिचं अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आले.