मुंबई : भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना त्यांच्या एका वक्तव्यामुळं सध्या अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. (लेस्बियन, गे, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर) अर्थात एलजीबीटीक्यू समुदायाविरोधात वक्तव्य करणं त्यांना अडचणीत आणणारं ठरतस आहे.
मुनगंटीवार यांच्या वक्तव्याला केंद्रस्थानी ठेवत आता कलाविश्वातूनही त्याविरोधात आवाज उचलला जात आहे.
बॉलिवूडमध्ये आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूर हिनं नुकतंच इन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.
स्टोरीमध्ये तिनं एका व्हिडीओची पोस्ट शेअर करत सुधीर मुनगंटीवार यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच निशाणा साधला आहे.
अडाणी..., अशिक्षित असं म्हणत तिनं त्यांच्यावर निशाणा साधला.
राज्याच्या विधानसभेत 'महाराष्ट्र पब्लिक युनिवर्सिटी अॅक्ट 2016' विधेयकावर चर्चा सुरु असतानाच भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी या स्पष्ट विरोध दर्शवला.
LGBTQIA समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का, हे विधेयक आहे.
अजुन अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण असे अनेक प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले.
भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून त्यांना धारेवर धरण्यात आलं. सोशल मीडियातूनही त्यांच्याविरोधात सूर आळवण्यात आला.
आपल्याला होणारा विरोध आणि कलाकारांकडूनही होणारे शाब्दिक वार पाहता आता सुधीर मुनगंटीवार यावर काय उत्तरं देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.