सारा अली खानचं भारावून टाकणारं नृत्यकौशल्य पाहिलं?

अभिनेत्री सारा अली खान सध्या यशशिखरावर आहे

Updated: Apr 3, 2020, 08:46 AM IST
सारा अली खानचं भारावून टाकणारं नृत्यकौशल्य पाहिलं?  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : आतापर्यंत अवघ्या तीन बॉलिवूड चित्रपटांतून झळकलेली अभिनेत्री सारा अली खान सध्या यशशिखरावर आहे. अतिशय कमी वेळातच साराने या विश्वात तिचं असं स्थान निर्माण केलं. अभिनयाच्या बळावर तिने नवोदित अभिनेत्री असतानाही आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर दिली. अभिनेता सैफ अली खान याची ही लेक आता तिच्या अभिनयासोबतच नृत्यकौशल्यामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. 

सारा खऱ्या अर्थाने सर्वगुणसंपन्न आहे हे सध्या सोशल मीडियावर तिनं पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे. मुख्य म्हणजे तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला बरेच व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. चाहत्यांनी कमेट्स करत साराच्या या कलेचंही कौतुक केलं आहे. या व्हिडिओमध्ये सारा, शास्त्रीय नृत्य करताना दिसत आहे. 

Coronavirus कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे साराचं नृत्याचं प्रशिक्षण सध्या बंद आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे हेसुद्धा स्पष्ट होत आहे. जवळपास ११ मिनिटांच्या या व्हिडिओला कॅप्शन देत तिने उत्कला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

साराने हा व्हिडिओ यासाठी शेअर केला आहे, की १ एप्रिल या दिवशी ओडिशा बिहारपासून वेगळं झालं होतं. वेगळं राज्य म्हणून अस्तित्वात आलं होतं. म्हणून हा दिवस उत्सका दिवस म्हणून साजरा केला जातो. या खास दिवसाचं औचित्य साधत साराचा हा व्हिडिओ आणि तिचं नृत्यकौशल्य तुम्हाला आवडलं का हे कमेंट बॉक्समध्ये कळवा.