मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार एका नवा वादात अडकला असल्याचं चित्र आहे. अक्षय कुमारने केलेल्या निरमा पावडरच्या जाहिरातीमुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. निरमा पावडरच्या जाहिरातीतून अक्षय कुमार आणि इतर कलाकार मावळ्यांच्या वेशात लढाईनंतर पुन्हा दरबारात परतल्याचं जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. अशाप्रकारे मावळ्यांच्या वेशात दाखवण्यात आलेल्या जाहिरातीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची संतप्त भावना शिवप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
निरमाच्या या जाहिरातीवर बंदी आणण्यात यावी, तसेच अक्षयनेही याबाबत माफी मागण्याची मागणी व्यक्त करण्यात येत आहे.
ज्या मराठा साम्राज्याने दिल्लीचे तख्त राखिले
त्यांच मराठा साम्राज्यावर कॅनेडियन ऍक्टर अक्षय कुमारनी विनोद करत जाहिराती केली..लाज वाटली पाहिजे
Stop @Nirma_ltd ad immediately#ApologizeNirma #ApologizeAkshay@akshaykumar @YuvrajSambhaji @Awhadspeaks@RtMaratha @MarathaOrg pic.twitter.com/y0UrAK8eOg— Soham Shinde (@sohamspeaks) January 6, 2020
ज्या मराठा साम्राज्याने दिल्लीचे ही तख्त राखिले; त्याच #मराठा साम्राज्यावर अक्षय कुमार ने विनोद करत निरमा ची जाहिरात केली आहे, @akshaykumar लवकरात लवकर माफी मागा नाहीतर, परिणामास सामोरे जा.#जाहिर_निषेध pic.twitter.com/WVDqxcpbNp
— #मराठा (@MarathaOrg) January 6, 2020
तुम्ही भलेही पैसे कमवन्यासाठी स्वतः नंगे नाचा कोणाला काही त्रास होणार नाही पण शिवरायांचा किंवा त्यांच्या मर्द मावळ्यांचा यापुढे असा अपमान नकोच. हे शिवभक्त कधीच सहन करणार नाही म्हणून ही जाहिरात लवकर बंद करा आणि माफी मांगा..
#ApologizeAkshay@akshaykumar pic.twitter.com/426hIG9eVj— Yogendra Gurve (@gurveyogendra_a) January 5, 2020
मावळे दाखवण्यात आलेले कलाकार दरबारात परतल्यानंतर महाराणी त्यांचं औक्षण करण्यासाठी येतात. त्यांच्या खराब झालेल्या कपड्यांवरुन महाराणीची प्रतिक्रिया आल्यानंतर, मावळे निरमा पावडरने आपले कपडे धुवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या जाहिरातीमुळे शिवप्रेमींमध्ये चांगलाच संताप दिसून येतोय. अक्षयच्या या जाहिरातीचा निषेध करत सोशल मीडियावर #ApologizeAkshay हा हॅशटॅग सुरु असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.