साराने आईविषयी असं काही सांगितलं की तिच्यावर आली तोंड लपवायची वेळ

अमृता सिंग हिच्यासोबतचं साराचं नातं.... 

Updated: Oct 8, 2019, 08:18 AM IST
साराने आईविषयी असं काही सांगितलं की तिच्यावर आली तोंड लपवायची वेळ  title=
साराने आईविषयी असं काही सांगितलं की तिच्यावर आली तोंड लपवायची वेळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने चित्रपट वर्तुळात प्रवेश केल्यापासूनच आपलं असं वेगळं कलाविश्व निर्माण केलं आहे. सारा कायमच तिच्या कामाविषयी कमालीची जागरुक आणि तितक्या समर्पक वृत्तीने काम करत असते. मुख्य म्हणजे सारा ही तिच्या कामासोबतच कुटुंबालाही तितकंच प्राधान्य देते. फार कमी वयातच कामाचा वाढता व्य़ाप आणि त्यामुळे सततचं व्यग्र वेळापत्रक यात सारा गुंतलेली असते. वेळ मिळेल आणि शक्य असेल तेव्हा मात्र ती कुटुंबासोबतच वेळ व्यतीत करते. 

साराने सोशल मीडियावर पोस्ट केलेला एक व्हिडिओ पाहता याचा अंदाज येत आहे. आई, अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबतचं साराचं नातं हे आई आणि मुलीपेक्षा मैत्रीचं जास्त आहे. त्याचीच एक झलक सध्या पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये तिने आईविषयीचं एक गुपित सर्वांसमोर आणलं आहे. साराने आईविषयी उघड केलेल्या या गुपितामुळे अमृताला चक्क तोंड लववावं लागलं आहे. 

आता साराने नेमकं असं सांगितलं तरी काय? असाच प्रश्न तुम्हालाही पडत आहे ना? तर, साराने तिच्या आईच्या डाएट प्लॅनविषयीची एक अशी गोष्ट समोर आणली आहे, जी पाहून तुम्हालाही हसूच येईल. आई आणि मुलगी फक्त खरेदी किंवा गप्पाच एकत्र मारतात असा तुमचा समज असेल तर, सारा तो चुकीचा समजवत आहे. कारण ती आपल्या आईसोबत या गोष्टींच्याही पलीकडे जात खवय्येगिरी करण्याला प्राधान्य देते. 

'जेव्हा आई आणि मी खाण्यासाठी बसतो, तेव्हा आम्ही डाएट वगैरेची चिंताच करत नाही', असं कॅप्शन तिने या व्हि़डिओला दिलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत असल्यामुसार सारा आणि अमृता कोणा एका उपहारगृहात असून, त्यांच्या समोरील टेबलवर एक मोठा डोसा आणि इतरही खाद्यपदार्थ दिसत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने खवय्येगिरी करणारी ही आई आणि मुलीची 'सॉलिड टीम' आहे, असंच म्हणावं लागेल.