राधिका आपटेच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा पारा वाढला, पाहा फोटो

राधिकानं हा लूक जितक्या सुरेखपणे हाताळला आहे ते पाहता... 

Updated: Aug 23, 2021, 07:30 PM IST
राधिका आपटेच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा पारा वाढला, पाहा फोटो  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : साचेबद्ध भूमिकांच्या वाटेवर न जाता प्रत्येक वेळी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या अभिनेत्री राधिका आपटे (radhika apte ) हिचा एक नवा लूक नुकताच सर्वांच्या काळजाचा ठोरा चुकवून गेला आहे. 

'नेटफ्लिक्स गर्ल' अशी ओळख झालेल्या राधिकानं रुपेरी पडद्यासोबतच ऑनलाईन सीरिजच्या दुनियेतही भक्कम स्थान मिळवलं. ट्रोलर्सच्या टीकांना आणि ट्रोलिंगलाही तिनं तोंड दिलं. अशी ही राधिका आता नव्यानं तिच्या फॉलोअर्सना थक्क करत आहे. 

नुकतेच तिनं सोशल मीडियावर असे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. जे पाहता सोशल मीडियाचा पारा चांगलाच वाढला आहे, असं म्हणायला हरकत नाही. पांढऱ्या रंगाची बिकीनी आणि त्यावर काळ्या रंगाचा चमकदार ओव्हरकोट आणि सोबत गळ्यात सोनसाखळीची जोड असा एकंदर तिचा लूक आहे. 

राधिकानं हा लूक जितक्या सुरेखपणे हाताळला आहे ते पाहता एक अभिनेत्री आणि एक मॉडेल म्हणून तिचं चाहत्यांनी कमालीचं कौतुक केलं आहे. तिला पाहून 'मनी हाईस्ट' या वेब सीरिजमधील 'नैरोबी' या पात्राची आठवण झाल्याच्या कमेंटही काही चाहत्यांनी दिल्या. 

काहींनी केलं ट्रोल 
एकिकडे राधिकाच्या फोटोवर लाईक्सची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे तिनं रक्षाबंधनच्याच दिवशी असे फोटो पोस्ट केल्याचं म्हणत ट्रोलर्सने तिला निशाण्यावर घेतलं. असं करणं योग्य नव्हे, अशा शब्दांत काहींनी तिची शाळाही घेण्यास सुरुवात केली होती.