लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाआधी प्रियांका-निकच्या घरी नवीन पाहुण्याची एन्ट्री

प्रियांकाकडून व्हिडिओ शेअर...

Updated: Nov 27, 2019, 12:25 PM IST
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाआधी प्रियांका-निकच्या घरी नवीन पाहुण्याची एन्ट्री title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या घरी एका तिसऱ्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. याबाबत स्वत: प्रियांकाने माहिती दिली आहे. १ डिसेंबरला प्रियांका-निकची पहिली वेडिंग एनिव्हर्सरी आहे. त्याआधीच प्रियांकाने पती निकला एनिव्हर्सरी गिफ्ट दिलं आहे. 

प्रियांकाने निकला दिलेलं हे गिफ्ट एक जर्मन शेफर्ट पपी आहे. निकला सरप्राइज देतानाचा हा व्हिडिओ प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका अमेरिकी पॉप स्टार निक जोनाससह विवाहबंधानात अडकली. या दोघांचा लग्नसोहळा राजस्थानच्या जोधपूर पॅलेसमध्ये पार पडला. प्रियांका-निकच्या विवाहसोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक व्यावसायिकांनीही हजेरी लावली होती. 

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका सध्या तिच्या आगामी नेटफ्लिक्स 'द व्हाईट टायगर'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती मुंबई, दिल्लीत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत सोशल मीडियावरुन चिंता व्यक्त केली होती.