जेव्हा बॉलिवूडची हसीना मुंबई लोकलने प्रवास करते...

रात्री उशिरा मुंबई लोकलने प्रवास करताना ही अभिनेत्री दिसत आहे. 

Updated: Mar 10, 2022, 01:52 PM IST
 जेव्हा बॉलिवूडची हसीना मुंबई लोकलने प्रवास करते... title=

मुंबई :  बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टीव्ह असतात. ते अनेकदा त्यांच्या डेली लाईफमधील प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. 

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते दररोज काही ना काही पोस्ट करताना दिसतात. नुकतंच एका बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रवासादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रात्री उशिरा मुंबई लोकलने प्रवास करताना ही अभिनेत्री दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी मुंबई लोकलमधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कलाकार बऱ्याचदा त्यांच्या स्वत:च्या गाडीने प्रवास करताना दिसतात. ते ट्रेनने प्रवास करणं टाळतात. सार्वजनिक ठिकाणी जाताना ते क्वचितच दिसतात. त्यामुळे अभिनेत्रीचा हा 

व्हिडिओ समोर येताच त्याची खूप चर्चा होत आहे. हा व्हिडिओ सगळ्याचं लक्षवेधत आहे.