...म्हणून पहिल्याच वर्षात तुटलेलं लग्न; नीना गुप्तांना का होतोय पश्चाताप?

प्रियकर, वगैरेसाठी त्यांना परवानगीच नव्हती.   

Updated: Aug 12, 2021, 08:04 PM IST
...म्हणून पहिल्याच वर्षात तुटलेलं लग्न; नीना गुप्तांना का होतोय पश्चाताप?  title=
नीना गुप्ता

मुंबई : जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण काही निर्णय घेत असतो. काही निर्णय हे तितकेच महत्त्वाचे आणि जीवनावर परिणाम करणारे असतात. विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक. विवाहबंधनात अडकण्यासाठी जोडीदाराला प्रत्येक प्रसंगी साथ देण्यासोबतच वेळ पडल्यास तडजोडही करण्याची तयारी दाखवावी लागते. पण, कित्येकदा ही समीकरणं बदलतात आणि वैवाहिक नात्यांना तडा जातो. 

अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या बॉलिवूडमद्ये काही नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एक. पण, त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र कैक वादळं येऊन गेली आहेत. पहिल्या लग्नामध्ये मिळालेलं अपयश त्यापैकीच एक. 

कोणाशी झालेलं पहिलं लग्न? 
'सच कहूं तो'  या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकातून नीना गुप्ता यांनी आपल्या पहिल्या लग्नाबाबता खुलासा केल्याचं कळत आहे. अमलान कुमार घोष नावाच्या व्यक्तीशी त्यांचं पहिलं लग्न झालं होतं. पण, हे लग्न एक वर्षभरही टीकू शकलं नाही. याचबाबत लिहिताना नीना गुप्ता म्हणतात, 'मी एका कॉलेज इवेंटमध्ये अमलान कुमार घोषला भेटले होते. ते आयआयटी दिल्लीमध्ये शिकत होते. हॉस्टेलच्या परिसरात आणि खुप वेळ एकत्र असायचो. त्याचे आईबाबा दुसऱ्या शहरात होते. पण, आजोबा जवळ, शेजारीच होते. माझ्यासाठी बॉयफ्रेंड असणं वगैरेसाठी परवानगीच नव्हती. पण हा अनुभव फारच वेगळा होता.'

जेव्हा पाकिस्तानी शत्रूनं कॅप्टन विक्रम बत्रांना 'माधुरी हमें दे दे' म्हणत चिथवलं... 

 

आर्य समाज मंदिरात लग्न... 
'मी कुटुंबाच्या उपस्थितीत आर्य समाज मंदिरात त्याच्याशी लग्न केलं होतं. अमलानच्या आई- वडिलांना हे नातं मंजुर नसल्यामुळे आम्ही त्यांना याबद्दल सांगितलंच नव्हतं. लग्नानंतर आम्ही दिल्लीतच एका फ्लॅटमध्ये राहण्यास आलो. पुढे अमलाननं नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मी दिल्लीमध्ये विश्वविद्यालयात संस्कृतमद्ये पदव्युत्तर शिक्षणासाठीची नावनोंदणी केली. याचदरम्यान मी रंगभूमीसाठीही योगदान देत होते. पण, अमलानला हे सर्व आवडत नव्हतं. मी एक साचेबद्ध पत्नी म्हणूनच वावरावं असं त्यांना वाटत होतं. ज्यामुळं लग्नानंतरच काही दिवसांनी आम्हा दोघांनाही याची जाणिव झाली होती, की आम्ही वेगळं होणंच फायद्याचं असेल.' नीना गुप्ता यांचे हे शब्द आणि त्यांचे अनुभव पाहता, कमी वयात केलेल्या चुकांचा त्यांना पश्चाताप असल्याचं स्पष्ट कळत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.