वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन

प्रदीर्घ काळापासून होती आजारी

Updated: Oct 4, 2020, 05:09 PM IST
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन title=

मुंबई : कोरोना काळात अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. काहींचं जाणं हे तर, अनेकांना धक्का देणारं ठरलं. यातच आता या झगमगणाऱ्या कलाजगतात पुन्हा एकदा दु:खाची लाट पसरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी एका सिने अभिनेत्रीचं निधन झालं आहे. 

हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिनं प्रदीर्घ आजाराशी झुंज देत असतानाच तिचा लढा अपयशी ठरला. शनिवारीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बंगळुरु येथे तिचं निधन झाल्याची माहिती समोर आली. मिष्टी गेल्या काही काळापासून किडनीच्या आजारनं त्रस्त होती. इतकंच नव्हे, तर ती काही महिन्यांपासून किटो डाएटही करत असल्याचं म्हटलं जात आहे. मिष्टीच्या पश्चात तिचा भाऊ आणि आई, असा परिवार आहे.  

 

एक्ट्रेस Mishti Mukherjee का निधन, इस वजह से बिगड़ी थी तबीयत

दिग्दर्शक राकेश मेहता यांच्या 'लाईफ की तो लग गई' या चित्रपटातून ती झळकली होती. काही आयटम साँग्समधूनही ती झळकली होती. बंगाली चित्रपटांतून ती अनेकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मिष्टीच्या निधनानं अनेकांनाच धक्का बसला आहे. इतक्या कमी वयात, किडनीच्या विकारानं तिचं निधन होण्याचं वृत्त येताच अनेकांनीच दैनंदिन जीवनशैली आणि त्याचा बिघडलेला समतोल कुठंतरी नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचीच प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.