मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलाईका अरोराचा अपघात झाला होता. ज्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या मलाईकाची प्रकृती चांगली आहे. यादरम्यान अशा अनेक अभिनेत्रींची नावं समोर येऊ लागली आहेत. ज्यांचा यापूर्वी अपघात झाला होता. यामध्ये शबाना आजमी, हेमा मालिनी, अनु अग्रवाल आणि महिमा चौधरी यांसारख्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. त्यांपैकी महिमा चौधरी ही एक अशी अभिनेत्री आहे. जिचं अपघातामुळे संपूर्ण करिअर संपलं. महिमा चौधरी ने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही खूप कौतुक केले गेले आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने महिमाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश करताच प्रेक्षकांच्या मनात एक खास ओळख निर्माण केली होती.
परंतु ती सध्या चित्रपट विश्वापासून दूर आहे, पण तरी तिची लोकप्रियता कमी झालेली नाही.
महिमा चौधरीने 1997 मध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.'परदेस' हा तिचा पहिला चित्रपट होता. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानसोबत अभिनेत्री महिमाने काम केलं आहे.
परंतु एकदा शुटींगवरुन परत येत असताना महिमा चौधरीचा अपघात झाला, ज्याने तिचं संपूर्ण आयुष्य संपवलं. यावरुन तुम्ही अंदाजा लावूच शकता की, तिचा किती मोठा अपघात झाला असावा.
एका मुलाखतीत महिमाने स्वत: या भीषण अपघाताबद्दल सांगितले आगे. खरेतर अजय देवगण आणि काजोलच्या 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरूमध्ये असताना हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले. तिथे एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली आणि तिच्या कारची विंडशील्ड फुटून तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेबाबत सांगताना महिमा म्हणाली, की तिला त्या वेळेला असे वाटत होते की, तिला आता मरण येणार आहे. त्यावेळी दवाखान्यात पोहोचल्यावर जेव्हा ती शुद्धीवरती आली तेव्हा तिने अजय आणि तिच्या आईचे बोलणे ऐकले. त्यानंतर जेव्हा तिने उठून आरशात स्वत:चा चेहरा पाहिला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला.
डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून काचेचे 67 तुकडे काढले. होते, ज्यामुळे ती विचित्र दिसू लागली होती. तिच्या टाक्यांमुळे आणि सर्जरीमुळे तिला घरातच राहावे लागले. ज्यामुळे तिला उन्हात बाहेर जाण्याची देखील परवानगी नव्हती.
तसेच तिची संपूर्ण खोली पूर्णपणे काळ्या पडद्यांनी झाकली होती, जेणे करुन सुर्य प्रकाश तिच्या चेहऱ्यावरती पडणार नाही. कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुर्याच्या UV किरणामुळे सुद्धा तिच्या चेहऱ्यावर डाग पडू शकेल, ज्यामुळे तिचा चेहरा आणखी खराब होईल.
या सगळ्यातून महिमा लवकर बरी झाली. परंतु त्यानंतर तिच्याकडे सिनेमांची ऑफर येणं जवळ जवळ बंदच झालं. ज्यानंतर 2006 मध्ये अभिनेत्रीनं लग्न केलं. परंतु तिचं हे नातं फार काळ टिकू शकलेलं नाही.