जगविख्यात खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये किम शर्मा; पाहा रोमॅन्टिक पोस्ट

आयुष्यातील अतिशय खास अशा या नात्याची जाहीर माहिती सर्वांनाच दिली आहे.   

Updated: Sep 6, 2021, 03:09 PM IST
जगविख्यात खेळाडूसोबत रिलेशनशिपमध्ये किम शर्मा; पाहा रोमॅन्टिक पोस्ट  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : क्रीडा आणि कला जगताचं नातं तसं नवं नाही. प्रेमाच्या बळावर या दोन्ही क्षेत्रांना अतिशय सुरेखपणे बांधून ठेवलं आहे. अशा या क्षेत्रांमध्ये आता आणखी एका नव्या जोडीची भर पडत आहे. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिनं तिच्या आयुष्यातील अतिशय खास अशा या नात्याची जाहीर माहिती सर्वांनाच दिली आहे. 

किम जागतिक ख्यातीच्या एका खेळाडूला डेट करत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून तिनं एक रोमॅन्टिक पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं. किमसोबत रिलेशनशिपमध्ये असणारा हा खेळाडू म्हणजे टेनिस स्टार लिएंडर पेस. किमनं नुकताच लिएंडर आणि तिचा एक सुरेख फोटो पोस्ट केला. (kim sharma and leander paes)

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये किम कॅमेरामध्ये दिसत असून, लिएंडर मोठ्या प्रेमात तिच्याकडे पाहताना दिसत आहे. 'दृष्ट न लागावी यासाठीचं चिन्हं' तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये वापरलं आहे. सोबतच किसिंग इमोजी वापरत तिनं या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

किम आणि लिएंडरच्या नात्याची अनेकांनाच कुणकूण लागली होती. जुलै महिन्यात ही जोडी गोव्यामध्ये सुट्टीसाठी गेली होती. त्याचवेळी त्यांच्या वेकेशनचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. मुख्य म्हणजे ही जोडी अनेकदा एकत्र दिसली आहे. त्यामुळं आता त्यांची ही रिअल लाईफ पार्टनरशिप चांगलीच गाजतेय असं म्हणायला हरकत नाही. 

पेस आणि किम यापूर्वीही दुसऱ्या पार्टनरसह नात्यामध्ये होते. रिया पिल्लई हिच्याशी पेसचा विवाह झाला होता. शिवाय अभिनेत्री महिमा चौधरी हिलाही डेट करत असल्याच्या चर्चा काही वर्षांपूर्वी रंगल्या होत्या. तर, किम शर्मा हर्षवर्धन राणे याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं गेलं होतं. पण, आता मात्र आयुष्याचा भूतकाळ विसरून हे दोघंही एका नव्या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहेत.