मुंबई : हिंदी चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीला येणारी आणि वेळोवेळी त्यांच्या काळजाचा ठाव घेणारी कतरिना आता मराठी पडद्यावरही झळकली आहे. कोणा एका३ चित्रपट किंवा आगामी प्रोजेक्टसाठी नव्हे तर, एका खास कार्यक्रमाच्या निमित्तानं कतरिनानं हजेरी लावली होती.
हा कार्यक्रम होता, झी मराठी अवॉर्ड्स 2021. मराठी कलाकारंच्या उपस्थितीनं झगमगून गेलेल्या या कार्यक्रमात यंदाच्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचीही उपस्थिती होती. यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेत्री कतरिना कैफचाही समावेश होता.
कतरिनाची उपस्थिती अर्थातच या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेली. तिच्या याच उपस्थितीसाठी आणि व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत पुरस्कार सोहळ्याला लावलेल्या हजेरीसाठी भावोजी, म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर यांनी कतरिनाचा पैठणी देऊन सन्मान केला.
महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणून मान असणारी ही पैठणी साडी, म्हणजे प्रत्येक मराठमोळ्या महिलेच्या हृदयाच्या जवळची बाब. हीच पैठणी देत बांदेकर यांनी कतरिनाचा सन्मान केला.
एरव्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्य़ा वहिनींशी संवाद साधत, त्यांचा पैठणी देऊन मान राखणाऱ्या आदेश भावोजींचा फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. अतिशय दिमाखदार अशा या सोहळ्याची रंगत आणि कराकारांचे धमाकेदार परफॉर्मन्स 30 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता पाहता येणार आहे.