तैमुरच्या 'या' सवयीमुळे करिनाच्या डोक्याला ताप; 'बेबो' करतेय सैफशी तुलना

अभिनेत्री करिना कपूर खान  (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर कायम एकटीव्ह असते. 

Updated: Jun 17, 2022, 05:08 PM IST
तैमुरच्या 'या' सवयीमुळे करिनाच्या डोक्याला ताप; 'बेबो' करतेय सैफशी तुलना title=

मुंबई :  अभिनेत्री करिना कपूर खान  (Kareena Kapoor Khan) सोशल मीडियावर कायम एकटीव्ह असते. करिना सोशल मीडियावर कायम तैमुरसोबत फोटो शेअर करत असते. करिनाने नुकतंच तैमुरसोबत एक सेल्फी फोटो पोस्ट केला. मात्र या फोटोपेक्षा जास्त चर्चा झाली ती कॅप्शनची. या कॅप्शनकडे सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. (bollywood actress kareena kapoor aka bebo shares selfie with her son taimur photo viral on social media)

या सेल्फीत तैमुर आपल्या आईच्या म्हणजेच करिनाच्या मांडीवर बसला आहे. तैमुरने आपला चेहर टोपीने झाकला आहे. तर करिना या फोटोत पाऊट करताना दिसतेय. "तैमुर सवयींच्या बाबतीत आपल्या वडिलांवर गेला आहे", असं करिनाने म्हटलंय. 

करिनाने पोस्ट केलेल्या या फोटोवर अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट केली आहे. अमृता अरोराने 'क्यूटेस्ट' अशी कमेंट केली आहे. तर करिश्मा कपूरने 'हार्ट' पोस्ट केला आहे. तसेच अनेक नेटीझन्स या माय-लेकाच्या गोड फोटोवर भरभरुन कमेंट्स करत आहेत.

लाल सिंह चड्ढामध्ये दिसणार

दरम्यान करीना लवकरच अमिर खान याच्या 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा येत्या 11 ऑग्सटला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या टीजरला चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे याच दिवशी अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा सिनेमाही रिलीज होतोय. त्यामुळे या दोन्ही स्टार अभिनेत्यांपैकी कोणाचा सिनेना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची दाद मिळवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x