Kangana on Amitabh Bachchan and Tiger Shroff: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) आपल्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे ओळखली जाते. एखाद्या मुद्द्यावरुन आपलं मत मांडताना कंगना कशाचीच फिकीर करत नाही. तिच्या याच स्वभावामुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. तसंच तिचं ट्वीटर (Twitter) खातंही ब्लॉक करण्यात आलं होतं. मात्र आता ट्विटर खातं पुन्हा सुरु झाल्यानंतर कंगना पुन्हा एकदा परखडपणे आपली मतं मांडत असून आता तर थेट बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने अमिताभ आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांना माफिया गँगचा (Mafia Gang) भाग असल्याचं म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'गणपत' (Ganpat) चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरवण्यात आली आहे. नेमका याच दिवशी कंगनाचा ''इमर्जन्सी' (Emergency) चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने कंगना संतापली आहे. बॉलिवूडची माफिया गँग जाणुनबुजून आपल्या चित्रपटाशी संघर्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचा कंगनाचा दावा आहे.
"जेव्हा मी माझ्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तारीख निवडत होते, तेव्हा यावर्षीचं चित्रपट कॅलेंडर बरंच मोकळं असल्याचं दिसलं होतं. कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीला बसणाऱ्या धक्क्यांमुळे असावं. मी माझ्या पोस्ट प्रोडक्शनच्या वेळापत्रकाच्या आधारे 20 ऑक्टोबर तारीख अंतिम केली होती," अशी माहिती कंगनाने दिली आहे.
When I was looking for a date for Emergency release I saw this year movie calendar is pretty much free, probably because of setbacks Hindi industry is having, based on my post production timelines I zeroed down on 20th October, with in a week T series owner Bhushan Kumar (cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 22, 2023
"पण एकाच आठवड्यात टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनी 20 ऑक्टोबरला आपला चित्रपट जाहीर केला आहे. संपूर्ण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मोकळा असताना आज अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ य़ांनी आपला महत्वाकांक्षी प्रकल्प 20 ऑक्टोबरला जाहीर केला आहे. हाहाहा...कदाचित बॉलिवूड माफिया गँगमध्ये पॅनिक मीटिंग होत आहेत," असा संताप कंगनाने व्यक्त केला आहे.
Announced his film on 20th October, entire October is free so is November, December and even September but today Mr Amitabh Bachchan and Tiger Shroff announced their ambitious project on 20th October,ha ha lagta hai panic meetings ho rahi hai Bollywood mafia gangs mein (cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 22, 2023
"आता मी ट्रेलरसह चित्रपटाच्या नव्या तारखेची घोषणा करेन. जेव्हा संपूर्ण वर्ष फ्री आहे तर उगाच संघर्ष कशाला? इंडस्ट्रीचे इतके वाईट हाल असतानाही इतकी निर्बुद्धी, काय खाता तुम्ही सगळे, तुम्ही इतके स्वत: ला विध्वंसक कसे काय करता?," असा टोला कंगनाने लगावला आहे.
Now release date for Emergency I will announce only one month in advance with the trailer itself, jab sara saal free hai toh clash ki zarurat kyu hai bhai?? Yeh buri halat hai industry ki phir bhi itni durbuddhi, kya khate ho yaar tum sab, itne self destructive kaise ho?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 22, 2023
कंगना सध्या तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.