सत्तरी ओलांडलेल्या तनुजाचा स्वीमसूट लूक व्हायरल

आजही त्यांचा हा लूक पाहताच.....  

Updated: Mar 4, 2020, 06:01 PM IST
सत्तरी ओलांडलेल्या तनुजाचा स्वीमसूट लूक व्हायरल title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आयुष्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी कधीची वाढच्या वयाचा आकडा या आनंदाच्या आड येता कामा नये. यासाठी कोणी दुसऱ्या व्यक्तीने सल्ले देण्यापेक्षा स्वत:च जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवणं कधीही उत्तम. हा असाच काहीसा मंत्र जपणारी हिंदी कलाविश्वातील एक ज्येष्ठ अभिनेत्री वयाच्या सत्तरीनंतरही चाहत्यांची मनं जिंकत आहे. एक काळ गाजवणारा हा चेहरा आहे अभिनेत्री तनुजा यांचा. 

अभिनेत्री काजोलची आई म्हणजेच तनुजा यांचा एक फोटो सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या फोटोमध्ये त्या, स्वीमसूट लूकमध्ये दिसत आहेत. वयाच्या ७६व्या वर्षी तनुजा यांचा हा लूक पाहून चाहत्यांनीही त्यांच्या या अंदाजाची स्तुती केली आहे. त्यांनी हा लूक करण्यामागे एक खास कारणंही आहे. हे कारण म्हणजे त्यांची मुलगी तनिषा हिचा वाढदिवस. 

अभिनेत्री तनिषा मुखर्जी म्हणजेच काजोलच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त या सेलिब्रिटी कुटुंबातील मंडळी अलिबागला गेले होते. तेथे एका रिसॉर्टमध्ये त्यांनी धमाल केली. याच क्षणांचे काही फोटोही तनिषाने सोशल मीडियावर पोस्ट केले. ज्यामध्ये स्मिमिग पूलजवळ अर्थात एका पूलसाईड पार्टीमध्ये तनिषासह तिची आई, तनुजा यांनीही या पार्टीचा आनंद घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर पोस्ट करण्य़ात आलेल्या या फोटोंमध्ये तनुजा एका निळसर रंगाच्या विविध छटा असणाऱ्या स्वीमसूटमध्ये दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर असणारं हास्य पाहता, जुन्या चित्रपटांमधील घायाळ करणाऱ्या तनुजा पुन्हा आठवत आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांच्या या फोटोवर अनेकांनीच कमेंट करत या लूकला दादही दिली आहे.