Salman Khan च्या घरी 'ही' अभिनेत्री येताच वाद विकोपाला, Salim Khan यांना पाहून आईचं टेन्शन वाढलं!

या' अभिनेत्रीमुळे Salman Khan ची आई गेली होती Depression मध्ये, असं काय केलं होतं 'या' अभिनेत्रीने?  

Updated: Nov 25, 2022, 07:19 PM IST
Salman Khan च्या घरी 'ही' अभिनेत्री येताच वाद विकोपाला, Salim Khan यांना पाहून आईचं टेन्शन वाढलं! title=
Bollywood actress helen came to Salman Khan house the argument broke out the mother tension increased nz

Salim Khan Second Marriage: सलमान खान (Salman Khan) हे बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध नावांपैकी एक आहे. त्याने त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक चढ उतार पाहीले आहेत सलमान खान हा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच वादात सापडायचा त्यामुळे त्याच्या कुटुंबालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. पण सलमान अवघ्या 15 वर्षांचा असताना त्याच्या आयुष्यात असा टप्पा पाहावा लागला की तो आतून तुटून गेला होता. वडील सलीम खान (Salim Khan) यांच्या एका निर्णयाने त्यांच्या कुटुंबात विसंवाद निर्माण झाला होता आणि त्यामागचे कारण होते बर्माहून भारतात आलेली अभिनेत्री, तिनं बॉलिवूड इंडस्ट्रीत (Bollywood Industry) नृत्याला वेगळे स्थान आणि व्याख्या दिली. (Bollywood actress helen came to Salman Khan house the argument broke out the mother tension increased nz)

जेव्हा सलीम खानने हेलनशी दुसरे लग्न

सलीम खान यांनी पहिले लग्न सुशीला चरक यांच्याशी केले, त्या लग्नानंतर सलमा खान (Salma Khan) बनल्या. त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होते, परंतु 1980 मध्ये, हेलनशी (Helen) त्यांचे दुसरे लग्न झाल्यानंतर सर्व काही विस्कळीत झाले. त्यावेळी ही बातमी कळताच सलीम खान यांच्या कुटुंबात खळबळ उडाली होती. सगळेच या नात्याच्या विरोधात होते पण सलीम आणि हेलन एकमेकांच्या प्रेमात होते. त्याचवेळी सलीम खानला सलमापासून वेगळं राहायचे नव्हते. अशा स्थितीत घरात कलह होणे साहजिकच होते.

 

 

सलमान खानही संतापला

त्यावेळी केवळ सलमा खानच नाही तर सलमान खाननेही या लग्नावर खूप आक्षेप घेतला होता. त्यावेळी सलमा खान या डिप्रेशनमध्ये (Depression) गेल्या होत्या आणि त्यानंतर सलमान खान सर्वात जास्त दुखावला गेला. पण अभिनेत्री हेलन यांच्यामध्ये एक खास गोष्ट अशी होती की, सलीम खानला स्वतःचे बनवल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या चांगुलपणाची जाणीव झाल्यानंतर केवळ सलमान, अरबाज, सोहेलच नाही तर खुद्द सलमा खाननेही त्या नात्याचा स्वीकार केला.