Isha Koppikar Divorce: अभिनेत्री ईशा कोप्पीकर तिच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. 14 वर्षांपूर्वी ईशा कोप्पीकर लग्नबंधनात अडकली होती. एक आदर्श कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं जात होता. दरम्यान लग्नाच्या 14 वर्षानंतर असं काहीतरी झालं की दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता ईशा कोप्पीकर तिचा पती टिमी नारंगपासून विभक्त झाली आहे.
ईशा कोप्पीकरच्या घटस्फोटाची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी समोर आली तेव्हा त्यांच्यात नेमके काय घडले असेल? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. पण आता ईशानेच आपल्या रिलेशनशिपवर भाष्य केले आहे. नाते तुटल्याचे खरे सत्य समोर आणले आहे. हे जोडपे का वेगळे झाले? याबद्दल जाणून घेऊया.
ईशा आणि टिमी या जोडप्याला एक 9 वर्षांची मुलगी आहे. ईशा तिच्या मुलीसोबत खूप पूर्वी घर सोडून गेली आहे. ईटी टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. ईशा आणि टिमी या दोघांनीही आपले नाते टिकवण्याचे, लग्न वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. ईशाने घर सोडले आहे आणि ती तिची मुलगी रियानासोबत वेगळी राहत आहे, असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही दोघांमध्ये काही काळापासून कम्पेबिलिटीची समस्या येत होती, असे ईशाने सांगितले. या जोडप्याने त्यांचे लग्न वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झाले नसल्याचा खुलासाही करण्यात आला आहे.
ईशा कोप्पीकरचा नवरा टिमी उर्फ रोहित नारंग यानेदेखील या वृत्तावर स्पष्टीकरण दिले आहे. मी आणि ईशा खरोखर वेगळे झालो आहोत. 'ईशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा, असे टिमीने सांगितले. ईशाने नोव्हेंबर 2009 मध्ये टिमी नारंगशी लग्न केले. दोघांची ओळख एका जिममध्ये झाली होती. यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले.