दीपिका आजच देणार खुशखबर? काल बाप्पाचे दर्शन आज थेट रुग्णालय

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण प्रेग्नेंसीच्या 9 व्या महिन्यात आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या आईसोबत हॉस्पिटमध्ये पोहोचली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 7, 2024, 05:45 PM IST
दीपिका आजच देणार खुशखबर? काल बाप्पाचे दर्शन आज थेट रुग्णालय title=

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने शुक्रवारी रणवीर सिंगसोबत गणेश चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली होती. दीपिका ही सध्या प्रेग्नेंसीच्या 9 व्या महिन्यात आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या आईसोबत हॉस्पिटमध्ये पोहोचली आहे. दीपिका पादुकोण ही निळ्या रंगाच्या कारमधून मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या घरात कधीही एका नवीन गोंडस पाहुण्याचे आगमन होऊ शकते. असा अंदाज चाहत्यांनी वर्तवला आहे. 

दीपिका पादुकोण शनिवारी दुपारी एचएन रिलायन्स हॉस्पिटलला भेट देताना दिसली. मीडियापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने छोट्या कारमधून हॉस्पिटलमध्ये पोहोचली. दीपिका आजच मुलाला जन्म देऊ शकते अशा बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दीपिका पादुकोण आजच देणार बाळाला जन्म? 

दीपिका पादुकोण हिने 28 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तिने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसुतीची तारिख दिली होती. अशा परिस्थितीत दीपिका पादुकोण आजच आई होऊ शकते. अशा बातम्या सध्या येत आहेत. मात्र, यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

काही दिवासांपूर्वीच दीपिकाने तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिनेत्रीने सोमवारी संध्याकाळी तिच्या इन्स्टाग्रामवर 14 फोटो शेअर केले होते.

2018 मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न

अभिनेत्री दीपिका पादुकोणने 2018 मध्ये रणवीर सिंगसोबत लग्न केले होते. दोघांची पहिली भेट 'रामलीला' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटात एकत्र काम करत असताना दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. दोघेही प्रेमात पडले आणि 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्या दोघांनी लग्न केले. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे 'रामलीला', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' आणि '83' मध्ये एकत्र दिसले आहेत. याशिवाय दीपिकाने रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटात देखील कॅमिओ केला आहे.