VIDEO VIRAL : सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरकडून मिस्ट्री मॅनला Kiss

Bhumi Pednekar Video : लग्न आणि रिसेप्शन सिद्धार्थ- कियाराचं. चर्चा मात्र भूमी पेडणेकर आणि तिच्यासोबत असणाऱ्या 'त्या' खास पाहुण्याची. कितीही लपवलं तरी तो समोर आलाच.   

Updated: Feb 16, 2023, 10:23 AM IST
VIDEO VIRAL : सिद्धार्थ- कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरकडून मिस्ट्री मॅनला Kiss   title=
Bollywood Actress Bhumi Pednekar spotted kissing alleged boyfriend Yash Kataria in Sidharth Kiaras eception Video Viral

Bhumi Pednekar Video : काही दिवसांपूर्वीच 'शेरशाह' (Shershah) फेम जोडी, (Sidharth Malhotra Kiara advani) सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी लग्नगाठ बांधत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. (Rajashtan) राजस्थानमध्ये राजेशाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर या जोडीनं कलाकार मित्रमंडळींसाठी (Mumbai) मुंबईमध्ये एका रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी रणवीर सिंग, विकी कौशल यांच्यापासून बी टाऊनमधील अनेक चेहऱ्यांनी हजेरी लावली. अभिनेत्रींनीसुद्धा या पार्टीला येत आपल्या मादक अदांनी सर्वांनाच घायाळ केलं. 

खरी चर्चा झाली ती म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar) लूकची. अतिशय ट्रेंडी लूकला पसंती देत भूमिनं या पार्टीदरम्यान सर्वांनाच घायाळ केलं. कमनीय बांध्याला साजेला लूक तिनं निवडला होता. पार्टी सुरु झाली, पार्टी संपली आणि भूमी त्या ठिकाणहून निघाली. आता याच पार्टीतील तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

कोणाला Kiss करतेय भूमी? 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पार्टीतून निघताना भूमी कारमध्ये बसतानाच कुणा एका Mistry Man ला Kiss करताना दिसत आहे. तो कोण, हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसू शकलेलं नाही. पण, अनेकांनीच शक्कल लढवत हा भूमीचा कथिक प्रियकर बिल्डर यश कटारिया असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण पार्टीमध्ये यश आणि भूमी एकत्रच होते. 

हेसुद्धा पाहा : Bhumi Pednekar नं गोल्डन साडीतं दाखवली Curvy फीगर, पाहा Photo

भूमी आणि यशमधील हे क्षण पाहता ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचं स्पष्ट होत आहे. अद्यापही भूमी किंवा यशनं त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही. पण, आता व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तरी नात्याविषयी ती काही बोलते का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

(Video Credits - MD GEET)

वेब सीरिजनंतर भूमी जास्तच चर्चेत... 

2015 मध्ये 'दम लगा ते हैशा' या चित्रपटामुळं भूमी चर्चेत आली. अभिनेता आयुष्मान खुराना याच्यासोबत तिनं स्क्रीन शेअर केली होती. यानंतरही ती बऱ्याच चित्रपटांमधून झळकली. पण, तिच्या नावाची जास्त चर्चा झाली ती Lust Stories या वेब सीरिजमुळं. येत्या काळात ती 'अफवाह', 'भीड', 'द लेडी किलर' अशा चित्रपटांमधून झळकणार आहे. या साऱ्यामध्ये भूमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल नेमका काय उलगडा करते याचीच चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल हे नक्की.