लग्नानंतर 17 व्या दिवशी अंकिता लोखंडेला दुखापत; अवस्था चिंता वाढवणारी

फोटो आणि व्हिडीओ कमालीचे व्हायरलही झाले. 

Updated: Dec 29, 2021, 11:32 AM IST
लग्नानंतर 17 व्या दिवशी अंकिता लोखंडेला दुखापत; अवस्था चिंता वाढवणारी  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. अत्यंत शाही पद्धतीत अंकिताचा लग्नसोहळा पार पडला, याचे फोटो आणि व्हिडीओ कमालीचे व्हायरलही झाले. 

फक्त लग्नच नव्हे, तर लग्नानंतरही अंकिता आणि विकीच्या Post Marriage आयुष्याची बरीच चर्चा झाली. (Ankita Lokhande)

नव्या घरात प्रवेश करणं असो किंवा मग लग्नानंतरचा पहिला वाढदिवस साजरा करणं असो. अंकिताला पाहून अनेकांनाच तिचा हेवा वाटला. 

पण, लग्नानंतर अवघ्या 17 दिवसांमध्येच अंकिताला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. 

अशिता धवननं अंकिताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जिथं नवविवाहित अंकिताच्या पायाला प्लास्टर लावल्याचं दिसत आहे. 

पायावर प्लास्टर असलं तरीही अंकिताचा उत्साह मात्र काही झालेला नाही. ती 'परदेसी परदेसी जाना नही', हे गाणं वाचताच त्यावर ठेका धरताना दिसत आहे. 

अंकिताच्या पायाल दुखापत झालेली असली, तरीही तिच्या मनावर मात्र याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. 

जगण्याचा प्रत्येक क्षण ती मनुरादपणे जगत आहे आणि चाहत्यांना वाटणारी चिंता दूर सारताना दिसत आहे.