रक्त गोठवणाऱ्या थंडीत अनन्या पांडेच्या बहिणीचा Hot Bath; प्रियकरासोबतचे खास क्षण व्हायरल

खास क्षण व्हायरल 

Updated: Dec 30, 2021, 01:55 PM IST
रक्त गोठवणाऱ्या थंडीत अनन्या पांडेच्या बहिणीचा Hot Bath; प्रियकरासोबतचे खास क्षण व्हायरल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे जितकी सोशल मीडियावर सक्रिय आहे, तितकेच तिच्या कुटुंबातील मंडळीही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. यामध्ये आघाडीवर आहे ती म्हणजे अनन्याची चुलत बहिण अलाना पांडे. 

अलानानं आतापर्यंत कायम तिचा बोल्ड लूक सर्वांच्या भेटीला आणला आहे. एखादा टॉपलेस लूक असो किंवा बिकीनी, अलाना कोणत्याही लूकमध्ये अगदी सहजपणे वावरताना दिसली आहे. 

सध्या म्हणे अलाना तिच्या होणाऱ्या पतीसोबत काही खास क्षणांचा आनंद घेत आहे. 

Ivor McCray याच्यासोबत ती सध्या Jacuzzi इथं गेली आहे. जिथे Vail मधील बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये ती या वातावरणाचा आनंद घेताना आणि हॉट बाथचाही आनंद घेताना दिसत आहे. 

जकूजीमध्ये अलाना ज्या क्षणांचा आनंद घेत आहे, त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

अलानाच्या हॉट बाथच्या व्हिडीओसोबतच ती ज्या ठिकाणी आहे, तेथील निसर्गसौंदर्य आणि सर्वत्र पसरलेला बर्फ एक वेगळीच अनुभूती देणारा ठरत आहे. 

अलनानं तिच्या या दौऱ्यातील काही सुंदर फोटो सर्वांच्यात भेटीला आणले आहेत. जे पाहता तिची आणि होणाऱ्या जोडीदाराची सर्वजण प्रशंसा करत आहेत. 

फोटोंच्या माध्यमातून या दोघांचीही अफलातून केमिस्ट्री दिसत आहे. ज्यामुळं तिचे हे फोटो तुफान व्हायरलही होत आहेत.