सारखं माझं नाव घेणं बंद कर, करण जोहरवर भडकली ही बॉलिवूड अभिनेत्री?

Koffee with karan : करण जोहरला या अभिनेत्रीने का सांगितलं की माझं नाव घेणं बंद कर.

Updated: Sep 29, 2022, 05:09 PM IST
सारखं माझं नाव घेणं बंद कर, करण जोहरवर भडकली ही बॉलिवूड अभिनेत्री? title=

मुंबई : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' (Koffee with karan) या हिट चॅट शोचा ७वा सीझन सुरू झाल्यापासून प्रत्येक एपिसोडमध्ये करण जोहरच्या तोंडावर सारखं एकाच सेलिब्रिटीचं नाव येतं. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसूल आलिया भट्ट (alia bhatt) आहे. जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये करण जोहर हा आलिया भट्टला देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिचे वर्णन करत असताना दिसतो. यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले. आता यावर आलियाची प्रतिक्रिया आली आहे.

'कॉफी विथ करण 7' (Koffee with karan 7) चा शेवटचा एपिसोड रिलीज झाला आहे. या शोच्या 13व्या आणि शेवटच्या भागात स्टँड-अप कॉमेडियन तन्मय भट्ट, कुशा कपिला, निहारिका एमएम आणि दानिश सैत यांनी होस्ट करणला बरेच प्रश्न विचारले. यातील काही प्रश्न आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि सारा अली खानबद्दलही होते.

करण जोहरने आपल्या पाहुण्यांना विचारले, 'पहिली गोष्ट सांगा की लोक म्हणतात की मी आलिया भट्टबद्दल खूप बोलतो, ते खरे आहे का?

यावर कुशाने म्हटलं की, 'यावर ऑनलाईन देखील खूप चर्चा होते. तन्मय म्हणाला की, ती प्रेग्नेंट आहे आणि तुझ्याकडे लॉन्च करायला आणखी एक व्यक्ती येणार आहे.'

करण जोहर नंतर म्हणाला की, मला आता खूप काळजी घ्यायला हवी. कारण माझं आणि आलियाचं बोलणं झालं होतं. करन मला असं नाही वाटत की, तु मला एहसान फरामोश समजावं. पण माझ्याबद्दल बोलणं बंद कर. तर मी म्हटलं ठीक आहे.'

करण जोहर म्हणाला की, 'मी नुकतेच एक जॅकेट घातले होते, ज्यावर इटालिया लिहिले होते. त्यावर देखील आलिया असे लिहिले आहे, असे लोकांनी सांगितले. यावर दानिश सैतने सांगितले की, करण शोमध्ये जितक्या वेळा आलिया 'ब्रह्मास्त्र'मध्ये शिवा बोलली आहे तितक्या वेळा आलिया भट्टचे नाव तू घेतले आहे. यावर करण म्हणाला - आलिया खूप गोड आहे.

एपिसोड संपताना करण जोहरने आलिया भट्टला फोन केला. कॉलवर आलियाने त्याला सांगितले की, माझ्याबद्दल कमी बोलत जा. तसंच माझ्याबद्दल वाईट बोलत जा.'