Bollywood : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी थेट युपीच्या मुख्यमंत्र्यांना भेटला आणि... मुबंई दौऱ्यातील मोठी अपडेट

मुंबईत योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडच्या कलाकारांसह एका चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या चर्चा सत्राला सुनील शेट्टी, जॅका श्रॉफ या कलाकारांसह गायक कैलाश खैर, सोनू निगम असे अनेक दिग्गज उपस्थित होते.  

Updated: Jan 5, 2023, 09:15 PM IST
Bollywood : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी थेट युपीच्या मुख्यमंत्र्यांना भेटला आणि...  मुबंई दौऱ्यातील मोठी अपडेट title=

UP CM Yogi Adityanath in Mumbai : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर(UP CM Yogi Adityanath in Mumbai)आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणूक यावी यासाठी योगी हा दौरा करत आहेत. या  मुंबई दौऱ्यात योगी आदित्यनाथ देशातील बड्या उद्योजकांशी चर्चा करत आहेत.योगींना उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारायची आहे. या अनुषंगाने त्यांनी बॉलिवूडला अभिनेत्याशी चर्चा केली. यावेळी  बॉलिवूडला अभिनेता सुनील शेट्टी (Bollywood actor Sunil Shetty) याने  बॉलिवूडच्या कलाकारांच्या समस्या मांडल्या. 

मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बॉलिवूडच्या कलाकारांनी कैफियत मांडली. अभिनेता सुनील शेट्टी यानं हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड प्रकरण थांबायला हवं  असं आवाहन आदित्यनाथ यांना केलं. तसंच बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचंही सुनील शेट्टीनं नमूद केलं. 

मुंबईत योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडच्या कलाकारांसह एका चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या चर्चा सत्राला सुनील शेट्टी, जॅका श्रॉफ या कलाकारांसह गायक कैलाश खैर, सोनू निगम असे अनेक दिग्गज उपस्थित होते.  

योगींना उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारायची

उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे योगींचे स्वप्न आहे. त्यासाठीही ते बॉलिवूडच्या दिग्गजांना भेटत आहेत. मुंबईची फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेण्याचा  योगी आदित्यनाथ यांचा डाव असल्याचा आरोप होत आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान या आरोपांना योगी आदित्यनाथ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. मुंबईतून फिल्मसिटी नेण्याचा आमचा कोणताही विचार नाही. आम्ही तर उत्तर प्रदेशात स्वत:ची फिल्मसिटी तयार करणार आहोत, असं योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टच सांगून टाकलं आहे.