मॉम सिनेमाची पहिल्याच दिवशी २ कोटी ९० लाखांची कमाई

मॉम सिनेमाने पहिल्याच दिवशी २ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. या सिनेमाने शनिवारीपर्यंत ५ कोटी रूपयांची कमाई केली.

Updated: Jul 10, 2017, 08:58 PM IST
मॉम सिनेमाची पहिल्याच दिवशी २ कोटी ९० लाखांची कमाई title=

मुंबई : मॉम सिनेमाने पहिल्याच दिवशी २ कोटी ९० लाखांची कमाई केली आहे. या सिनेमाने शनिवारीपर्यंत ५ कोटी रूपयांची कमाई केली. मॉम सिनेमाने एकूण ७ कोटी ९८ लाखांची कमाई केली आहे

यासोबत सिनेमाने दोन दिवसात ७ कोटी ९८ लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवसाबद्दल जरी बोलायचं झालं तरी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठं प्रदर्शन केलं. विकेंड पर्यंत या सिनेमाने ६ कोटी ४२ लाखांची कमाई केली, आतापर्यंत या सिनेमाने १४ कोटी रूपयाची कमाई केली आहे.

सिल्व्हर स्क्रीनवर परतणाऱ्या श्रीदेवीच्या भूमिकेची दर्शकांनी वाह वा केली आहे. हिंदी भाषेतील १ हजार २६० स्क्रीनवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. 2012मधील 'इंग्लिश विंग्लिश'नंतर महान कलाकार श्रीदेवीने एका मोठ्या खंडाने सिनेजगतात प्रवेश केला आहे.