डान्सनं भुरळ घालणारा टायगर बनला जादूगर; पाहा जबरदस्त व्हिडीओ

अभिनेत्यानं अशी दाखवली जादू की, चाहते म्हणाले...

Updated: Aug 6, 2021, 06:36 PM IST
डान्सनं भुरळ घालणारा टायगर बनला जादूगर; पाहा जबरदस्त व्हिडीओ  title=
छाया सौजन्य- सौशल मीडिया

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ ( Tiger Shroff) हा अभिनयासोबतच त्याच्या अफलातून डान्ससाठीही ओळखला जातो. टायगरचे पाय थिरकू लागले की आपोआपच पाहणारे घायाळ होतात. असा हा अभिनेता आता त्याच्यामध्ये दडलेल्या आणखी एका कलेनं सर्वांचं लक्ष वेधत आहे. खुद्द टायगरनेच त्याच्या या नव्या कौशल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये टायगर एक कार्ड चक्क हवेत तरंगवत आहे. टायगरने शेअर केलेला हा जबरदस्त व्हिडीओ अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. यामध्ये काहीजणांसमोर टायगर एक कार्ड हातात घेऊन त्याकडे एकटक पाहत क्षणार्धातच त्याला तरंगवत आहे. बरं, व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिल्यानुसार त्यांनं ही जादू आवडली असल्यास पुढच्या वेळी कोणा एका व्यक्तीसोबत अशीच जादू करणार असल्याचा दावा केला आहे. 

टायगरनं केलेली ही जादू पाहता आता चाहते त्याच्या पुढच्या जादूची मागणी करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मुख्य म्हणजे टायगर कोणा एका व्यक्तीवर जादू करण्यात यशस्वी ठरेल का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते काजोलच्या दारात; पण तिने दिलेली वागणूक खटकणारी, तुम्हीच पाहा...

 

दरम्यान, नुकतंच टायगरनं त्याच्या 'हिरोपंती' या चित्रपटाच्या सिक्वलच्या पहिल्या टप्प्याचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. यंदाच्याच वर्षी 3 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अहमद खान दिग्दर्शित या चित्रपटात तारा सुतारियासुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.