Guess Who : 'हा' चिमुकला आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का?

बायकोसह मुलगी आहे बॉलिवूडची स्टार, दोन लग्न केलेल्या स्टार अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? 

Updated: Aug 28, 2022, 05:19 PM IST
Guess Who : 'हा' चिमुकला आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का?  title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो अधिकतर अभिनेता-अभिनेत्रीचे असतात. या फोटोत त्यांचे काही फोटो लहाणपणीचेही असतात. या लहाणपणीच्या फोटोत त्यांना ओळखणे अवघड जाते. असाच एका बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो आता समोर आला आहे.ज्यामध्ये तो खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखता येतोय का? आम्ही तुम्हाला या अभिनेत्यासंबंधीत काही माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला ओळखणे सोपे होईल.

आई प्रसिद्ध अभिनेत्री
या फोटोत हा मुलगा जितका गोंडस दिसत आहे, तितकाच आजच्या काळातही तो तितकाच देखणा आहे. त्याचे दिसण्या आणि हसण्यावर अनेक मुली फिदा आहेत. विशेष म्हणजे या अभिनेत्याची आई देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.वडिलांनी तर क्रिकेटच्या मैदानात झेंडा रोवला आहे. त्याचबरोबर
त्याच्या बहिणीनेही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे

मुलगी स्टार अभिनेत्री
ज्या बॉलिवूड अभिनेत्याचा हा फोटो आहे त्याने एक नाही तर दोन बड्या बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. पहिल्या अभिनेत्रीशी त्याचा घटस्फोट झाला आहे. तर दुसरी पत्नी अभिनयासह सुंदरतेतही आघाडीवर आहे. या अभिनेत्याची मुलगी सध्या बॉलिवूडमध्ये मोठी अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री देखील अभिनयासह सुंदतेसाठी प्रसिद्ध आहे.   

अजूनही ओळखता येत नाहीए? चला तर मग तुम्हाला त्याच्या काही चित्रपटांबद्दल सांगतो. आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याने आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'मैं खिलाडी तू अनारी', 'बंटी और बबली', 'हम साथ साथ हैं' आणि 'आरक्षण' हे त्यापैकी काही आहेत. आता इतक्या सिनेमांची नावे सांगितल्यानंतर तुम्हाला ओळखता आले असेलचं. तरीही तुम्ही ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो, हा बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा बालपणीचा फोटो आहे. 

दरम्यान सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच त्याच्या हृतिक रोशनसोबतच्या 'विक्रम वेधा' या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होत आहे.