सैन्यदलासाठी खुद्द ‘हा’ अभिनेता चपात्या बनवतो तेव्हा...

 बसला ना तुम्हालाही धक्का?

Updated: Sep 25, 2018, 03:31 PM IST
सैन्यदलासाठी खुद्द ‘हा’ अभिनेता चपात्या बनवतो तेव्हा... title=

मुंबई: आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत बरेच सेलिब्रिटी काही महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. अशाच सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूत. सुशांतने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये तो चक्क चपात्या लाटताना दिसत आहे. बसला ना तुम्हालाही धक्का?

सुशांत आणि चपात्या... पडलात ना तुम्हीही पेचात? सुशांत त्याचं हे स्वयंपाक कौशल्य दाखवत आहे ते थेट सैन्यदलाच्या कॅन्टीनमध्ये.

सैन्यदल अधिकाऱ्यांसोबत काही क्षण व्यतीत करत त्यांची आपल्याला शक्त होईल त्या मार्गाने सेवा करण्याची त्याची ही युक्ती सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे.

सोशल मीडियावलर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी तो शेअरही केला आहे.

देशाची सेवा करणाऱ्या सैन्यदलाचीच सेवा करण्याची ही  संधी सुशांतला मिळाली आणि हा व्हिडिओ पाहता खऱ्या अर्थाने त्याने या संधीचं सोनं केलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.