....आणि रागाच्या भरात Sunny Deol नं समोरच्यावर फेकली 'ती' वस्तू

त्याची दहशत पाहायला मिळाली नाही, असं फार क्वचितच घडतं.   

Updated: Aug 16, 2021, 08:42 PM IST
....आणि रागाच्या भरात Sunny Deol नं समोरच्यावर फेकली 'ती' वस्तू title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि त्याचा ऑनस्क्रीन दिसणारा रागीट स्वभाव हा अनेकांना नवा नाही. हँडपंप मुळापासून काढून समोरच्याचा थरकाप उडवणं असो किंवा मग ये ढाई किलो का हाथ है... असं म्हणत दमदाटी करणं असो, सनी देओलला राग आला आणि त्याची दहशत पाहायला मिळाली नाही, असं फार क्वचितच घडतं. 

गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये नव्या जोमाच्या कलाकारांची चलती पाहता सनी रुपेरी पडद्याच्या मुख्य प्रवाहातून काहीसा दूर गेला. पण, त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. त्याचे चित्रपट आणि त्यातील संवादांना आजही तितकीच लोकप्रियता मिळते. याला खतपाणी मिळतं ते म्हणजे त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून. 

अशा या सनी देओलला आता म्हणजे इतका राग आला, की त्यानं हातातला स्क्रीप्टचा कागदच फाडून समोरतच्या व्यक्तीच्या हातात टेकवला. खुद्द सनीनंच सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पुन्हा एकदा अँग्री यंग मॅनच्याच रुपात दिसत आहे. त्याच्या डोळ्यांमध्ये दिसणारा संताप शब्दांतही मांडण्याच्या पलीकडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये सनी, 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या दामिनी' (Damini) या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे. 'तारीख पे तारीख' हा डायलॉग बोलत असणाऱ्या सनीला समोर बसलेल्या व्यक्तीनं सारखं टोकण्यास सुरुवात केली, बोलताना त्यात भावना दिसूदे वगैरे.... 

बस्स, मग काय सनीचा पारा चढला आणि त्यानं म्हटलं, 'अरे तुमने मुझे क्या समझ रखा है? इंद्रानगर का गुंडा हूं मैं क्या?' इतक्यावरच न थांबता त्यानं स्क्रीप्ट फाडून समोरच्याच्या हातात टेकवून तिथून काढता पाय घेतला. 'नही होना मुझे व्हायरल यार', असं कॅप्शन त्यानं या व्हिडीओला दिलं आहे. त्याच्या या व्हिडीओला लाखो लाईक्स मिळाले आहेत.