सुपरस्टारच्या पत्नीसोबत सनी देओलचं अफेअर; पत्नीला कळताच...

आजही त्यांचं नातं चाहत्यांच्या नजरा वळवतं.

Updated: Mar 26, 2022, 03:07 PM IST
सुपरस्टारच्या पत्नीसोबत सनी देओलचं अफेअर; पत्नीला कळताच... title=

मुंबई : अभिनेता सनी देओल हा त्याच्या अभिनयापेक्षाही राकट शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. जणू काही ‘ढाई किलो का हाथ’ हा डायलॉग त्याच्यासाठीच लिहिला गेला असावा. सनीनं रुपेरी पडदा गाजवण्यासोबतच आपल्या खासगी आयुष्यानंही सर्वांच्या नजरा वळवल्या. ‘बेताब’ या चित्रपटाच्या वेळी त्याचं नाव अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी जोडलं गेलं होतं.

सनी त्यावेळी विवाहित होता. पण, अमृता यापासून अनभिज्ञ होती. तिला जेव्हा याची कुणकूण लागली तेव्हा तिनं स्वत:हून त्याला दूर लोटलं.

यानंतर सनी देओलचं नाव अभिनेत्री आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांची पत्नी, डिंपल कपाडियाशी जोडलं गेलं. आजही त्यांचं नातं चाहत्यांच्या नजरा वळवतं.

सनी आणि डिंपलनं ‘नरसिंहा’, ‘गुनाह’, ‘अर्जुन’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. सनी आणि डिंपलच्या नात्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. असं म्हणतात की त्यावेळी हे दोघंही विवाहित होते.

आपल्या वैवाहिक आयुष्यात वादळ येऊ नये म्हणून त्यांनी हे नातं कधी पुढे नेलं नाही. दरम्यान, सनीच्या पत्नीला या नात्याची माहिती मिळाली.

आपल्या पतीचं डिंपलशी असणारं नातं तिला हादरवून गेलं. असंही म्हटलं जातं की ट्विंकल आणि रिंकी खन्ना सनीला ‘छोटे पापा’ म्हणूनही हाक मारत होत्या. पतीची ही प्रकरणी पाहून सनीच्या पत्नीनं म्हणजे पूजानं त्याला इशाराच दिला होता.

डिंपलशी असणारी जवळीक अशीच वाढत राहिली तर मी मुलांना गेऊन कुठच्या कुठे दूर निघून जाईन, अशी ताकिद तिनं दिली आणि या नात्यातून हळुहळू सनी काहीसा बाहेर आला.