वाईट दिवस हेच असतात का? मुलाच्या निधनानंतर अभिनेत्याचा घटस्फोट

खलनायक म्हणून प्रेक्षकांनाही घाबरवणाऱ्या अभिनेत्याच्या मुलाचं निधन, त्यानंतर पत्नीनेही सोडली साथ  

Updated: Mar 26, 2022, 02:32 PM IST
वाईट दिवस हेच असतात का? मुलाच्या निधनानंतर अभिनेत्याचा घटस्फोट title=

मुंबई : आयुष्य म्हटलं तर चांगले आणि वाईट दिवस तर आलेचं. त्यामुळे दुःख तर होणारचं. खलनायक म्हणून  प्रेक्षकांनाही घाबरवणाऱ्या अभिनेत्याच्या आयुष्यात देखील वाईट दिवस आले. आधी पाच वर्षांच्या मुलाचं निधन झालं आणि त्यानंतर सततच्या भांडणांनंतर पत्नी देखील सोडून गेली. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून साऊथ आणि हिंदी चित्रपट अभिनेते प्रकाश राज आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू... 

प्रकाश राज यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल तर अनेकांना माहिती आहे. पण त्यांत्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मुलाच्या निधनानंतर त्यांनी अनेक वाईट दिवसांचा सामना केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

साऊथ आणि हिंदी चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांचा 5 वर्षांचा मुलगा पतंग उडवताना एक फूट टेबलवरून पडला, आणि त्यानंतर त्याची तब्येत ढासळू लागली. काही महिन्यांनीच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. 

मुलाच्या निधनानंतर प्रकाश राज आणि त्यांच्या पत्नीमध्ये कायम वाद व्हायचे. अखेर दोघांनी वेगळ होण्याचा निर्णय घेतला. प्रकाश यांना दोन मुली देखील पण मुलाच्या निधनानंतर त्यांच्या मनात मोठी पोकळी तयार झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

1994 साली प्रकाश राज यांचं लग्न झालं होतं. पण आयुष्यात आलेल्या वाईट प्रसंगांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रकाश राज यांनी 2010 साली कोरियोग्राफर पोनी वर्मासोबत लग्न केलं. दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे.