Ranbir- Alia Wedding : आलिया-रणबीरसारखाच वेडिंग लूक हवाय? हे नक्की वाचा

मैत्री आणि प्रेमाचं हे नातं त्यांनी एका वेगळ्या टप्प्यावर नेत सर्वांनाच थक्क केलं.   

Updated: Apr 15, 2022, 02:44 PM IST
Ranbir- Alia Wedding : आलिया-रणबीरसारखाच वेडिंग लूक हवाय? हे नक्की वाचा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Ranbir- Alia Wedding : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांनीही नुकतंच विवाहबंधनात अडकत सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली. मैत्री आणि प्रेमाचं हे नातं त्यांनी एका वेगळ्या टप्प्यावर नेत सर्वांनाच थक्क केलं. 

रणबीर आणि आलिया या दोघांच्याही लग्नाचीच चर्चा सध्या संपूर्ण कलाविश्वात सुरु आहे. आलियाचा लेडिंग लूक कसा असेल, रणबीर लग्नासाठी कोणत्या कपड्यांना पसंती देईल इथपासून ते अगदी त्यांच्या दागिन्यांची निवड कसी असेल इथपर्यंत अनेक प्रश्न विचारत चाहत्यांनी कुतूहल व्यक्त केलं. 

या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हा मिळाली, ज्यावेळी ही जोडी माध्यमांसमोर येत त्यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. 

आलिया नववधूच्या रुपात समोर आली आणि पाहणारेही थक्क झाले कारण तिनं यावेळी नो मेकअप लूकला पसंती दिली होती. नैसर्गिक सौंदर्याच्या बळावर ती या रुपात सर्वांसमोर आली. 

रणबीरही त्याच्या चेहऱ्यावरील आनंदामुळं तिला शोभून दिसत होता. लग्नासाठी या दोघांनीही सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याला पसंती दिली होती. (sabyasachi bride)

सब्यसाचीच्या कलेक्शनमधून आलियानं आयव्हरी रंगाला पसंती दिली होती. तिनं लग्नासाठी आयव्हरी ऑर्गेन्झा साडी, त्यावर टीला एम्ब्रॉयडरी वर्क आणि सब्यसाचीच्याच हेरिटेज ज्वेलरीला पसंती दिली होती. 

तर, रणबीरनं लग्नासाठी सिल्कची शेरवानी घातली होती. या शेरवानीची शान त्यावर असणाऱ्या अनकट डायमंड्स अर्थात तास नसलेल्या हिऱ्यांनी वाढवली होती. सिल्क ऑर्गेन्झा साफानं त्याचा लूक पूर्ण केला होता. 

किमान मेकअप आणि दिखावा ही या लग्नातील अधोरेखित करण्याजोगी बाब ठरली. रणबीर आणि आलिया ही जोडी त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं पुन्हा चाहत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेली.