कसं असेल आलिया-रणबीरचं वैवाहिक आयुष्य? मुलांबद्दल ज्योतिषविद्या सांगते...

सेलेब्रिटी एस्ट्रोलॉजरची आलिया-रणबीरच्या वैवाहिक आयुष्यबद्दल भविष्यवाणी... कसं असेल त्यांच वैवाहिक आयुष्य?   

Updated: Apr 15, 2022, 02:28 PM IST
कसं असेल आलिया-रणबीरचं वैवाहिक आयुष्य? मुलांबद्दल ज्योतिषविद्या सांगते... title=

मुंबई : अखेर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचं लग्न झालं. गुरूवारी दोघांनी कुटुंब आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये आलिया सुंदर तर रणबीर रुबाबदार दिसत आहे. आता चर्चा रंगत आहे, ती म्हणजे दोघांच्या वैवाहिक आयुष्य बद्दल. एका प्रसिद्ध सेलेब्रिटी एस्ट्रोलॉजरचं प्रेडिक्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

विरल भयानीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सेलेब्रिटी एस्ट्रोलॉजर डॉ. आचार्य विनोद कुमार यांचं प्रेडिक्शन शेयर केलं आहे. आचार्य विनोद  म्हणतात, 'लग्नामुळे दोघांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. लग्नानंतर दोघांचं करियर नवी दिशा घेईल...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ते पुढे म्हणाले, 'सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोघे ही चांगले मित्र राहतील. दोघे कायम एकमेकांची मदत करतील. त्यांचं लग्न वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगलं होईल.  त्यांची चमक सर्वांना दिसेल. '

रणबीरबद्दल सांगायचं झालं, तर लग्नानंतर बॉक्स ऑफिसवर त्याला फायदे पाहायला मिळतील. जोडप्याला चाहत्यांचे प्रेम मिळेल आणि त्यांना भविष्यात मुलेही होतील असे ज्योतिषशास्त्राने सांगितले आहे. 

महत्त्वाचं म्हणजे आलिया आणि रणबीरच्या मुलांचा गोंडसपणा कल्पनेपलीकडचा असेल. हे लग्न आलिया रणबीरच्या आयुष्यात शांतता आणणार आहे. असं देखील सेलेब्रिटी एस्ट्रोलॉजर डॉ. आचार्य विनोद कुमार यांनी सांगितलं आहे.