मुलीसाठी घटस्फोटानंतरही पत्नीसोबत एकत्र आला बॉलिवूड अभिनेता

कलाविश्वात नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने या नात्याना वेगळी वळणंही मिळतात. नात्यांमध्ये येणारा दुरावा हासुद्धा त्याचाच एक भाग. पण, फक्त दोन व्यक्तींच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्याचा इतरही नात्यांवर परिणाम होता कामा नये असाच काहींचा मानस असतो. बॉलिवूडमध्येही अशा काही सेलिब्रिटी जोड्याआहेत, ज्यांनी वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतरही त्यांच्यात असणारं मैत्रीचं नातं मात्र कायम ठेवलं आहे. 

Updated: Feb 14, 2020, 11:46 AM IST
मुलीसाठी घटस्फोटानंतरही पत्नीसोबत एकत्र आला बॉलिवूड अभिनेता  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कलाविश्वात नाती जितक्या वेगाने आकारास येतात तितक्याच वेगाने या नात्याना वेगळी वळणंही मिळतात. नात्यांमध्ये येणारा दुरावा हासुद्धा त्याचाच एक भाग. पण, फक्त दोन व्यक्तींच्या नात्यात आलेल्या दुराव्यामुळे त्याचा इतरही नात्यांवर परिणाम होता कामा नये असाच काहींचा मानस असतो. बॉलिवूडमध्येही अशा काही सेलिब्रिटी जोड्याआहेत, ज्यांनी वैवाहिक जीवनात दुरावा आल्यानंतरही त्यांच्यात असणारं मैत्रीचं नातं मात्र कायम ठेवलं आहे. 

सध्याच अशाच एका सेलिब्रिटी जोडीची चर्चा सुरु आहे, ज्यांनी फक्त त्यांच्या मुलीसाठी एकत्र येत हे नातं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अधुना यांचा एक फोटो सोशल मीडियावर बराच लक्ष वेधत आहे. हा फोटो लक्ष वेधण्यामागचं कारणंही तसं आहे. वैवाहिक नात्यातून वेगळं होत विभक्त आयुष्य जगणाऱे हे दोघंही त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले. 

सोशल मीडियावर फरहानने त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सुरु असणाऱ्या सेलिब्रेशनमधील एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तो, त्याची मुलगी आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणजे अधुनाही दिसत आहे. या फोटोसह फरहानने एक कॅप्शन लिहित त्याच्या मुलीला या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

'मनमुरादपणे आयुष्य जग. सर्व स्वप्न पूर्ण कर. अधुना आणि मी कायम तुझ्यासोबत आणि तुझ्या पाठीशी उभे असू', असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. आपल्या मुलीसाठी फरहान आणि अधुनाचं हे एकत्र येणं अनेकांची मनं जिंकून गेलं. नात्यांची कटूता मागे ठेवत नवी सुरुवाच करत त्यांनी उचललेलं हे पाऊल नेटकऱ्यांचीही दाद मिळवून गेलं.