'शांत राहिलो तिथेच चुकलो'; कोणत्या गोष्टीची अर्जुन कपूरला इतकी खंत?

त्याच्या आयुष्यात इतकं सगळं घडत होतं आणि...   

Updated: Aug 17, 2022, 01:28 PM IST
'शांत राहिलो तिथेच चुकलो'; कोणत्या गोष्टीची अर्जुन कपूरला इतकी खंत?  title=
Sonam Kapoor Arjun kapoor Koffee with karan 7 viral video on actors personal life

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला सेलिब्रिटी कुटुंबातील सदस्य असतानाही बॉलिवूडमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. अनेकदा तर, त्यानं साकारलेल्या भूमिका पाहण्याआधी प्रेक्षकांनी खिल्लीही उडवली. पण, त्या साऱ्यावर मात करत अर्जुननं मात्र या परिस्थितीकडे सकारात्मततेनं पाहत आपल्यामध्ये काही बदल घडवून आणले. 

स्थुलता नियंत्रणात आणण्यापासून चांगल्या चित्रपटांची निवड करण्यापर्यंत त्यानं बर्याच गोष्टींवर काम केलं. सहसा वादांपासून दूर राहणारा हाच अर्जुन सध्या मात्र एका अशा मुद्द्यावर व्यक्त झाला आहे, जे पाहून अनेकांच्याच नजरा तो नेमकं काय म्हणाला आहे त्यावरच रोखल्या जात आहेत. 

गेल्या काही काळाबासून बॉलिवूड चित्रपटांवर बंदी आणण्याचा ट्रेंड बराच चर्चेत आहे. मग तो (Akshay Kumar Raksha Bandhan) अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' असो किंवा (Aamir Khan laal Singh chaddha) आमिरचा 'लाल सिंह चड्ढा'. चित्रपटांवर समाजातील एका वर्गाकडून बंदी आणण्याची मागणी प्रकर्षानं होत असल्याचं पाहून आता याविरोधात कलाकारांनी एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया अर्जुननं दिली. 

माध्यमांशी संवाद साधताना अर्जुननं या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. 'मला वाटतंय की, याबाबत मौन बाळगून आपणच चूक केलीये. आपल्या सामंजस्य आणि समजुदारपणाचा ही मंडळी गैरफायदा घेत आहेत. आपलं कामच सर्वकाही बोलेल, असं समजून आपण चूक केलीये', असं तो म्हणाला. 

तू कशी बहीण आहेस गं? भर कार्यक्रमात सोनमवर का संतापला अर्जुन, पाहा Video  

 

कायम आपले हात खराब करण्याची गरज नाही, पण मला वाटतं की आपण फार सहन केलं आहे ज्यामुळं या मंडळींना बंदीच्या मागणीची सवयच लागलीये असं म्हणत आता कलाकारांनी एकत्र येत मुद्द्यावर काहीतरी करण्याची गरज आहे. 

सतत चिखल उडवत राहिल्यास नवी कारही खराब होऊन जाते. आम्हीतर बरीच चिखलफेक झेलली. गेल्या काही वर्षांपासूनतर आम्ही डोळेच बंद करून घेतले आहेत कारण, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लोकांची धारणा बदलले असंच वाटत होतं, असं बोलताना अर्जुननं आपल्या मनातील खंत व्यक्त केली.