महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. 

Updated: Jul 1, 2022, 07:33 PM IST
महाराष्ट्रातील राजकारणावर अनुपम खेरचा उपरोधिक टोला  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. वैयक्तिक आय़ुष्यासह अनुपम खेर अनेक विषयावर आपले मत मांडत असतात. आता अनुपम खेर यांनी महाराष्ट्रातीस सत्तासंघर्षावर एक पोस्ट केली आहे. ही त्यांची पोस्ट खुप चर्चेत आहे.  

पोस्टमध्ये काय?
अनुपम खेर यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय महानाट्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये खेर लिहितात, "पॉलिटिशन्सको हरा के दिखाओ, तब जाने रमेशबाबू!" असे कॅप्शन लिहले आहे. या कॅप्शनसोबत खेर यांनी भारतीय बुद्धीबळपटू जीएम प्रग्याननंदा याचा बुद्धीबळ खेळतानाचा फोटोही पोस्ट केला आहे. महाराष्ट्र पॉलिटिक्स असा खास हॅशटॅग खेर यांनी खाली वापरलेला दिसतो.

प्रग्याननंदा या 16 वर्षीय बुद्धीबळपटुने फेब्रुवारीत नॉर्वेच्या जगज्जेता बुद्धीबळपटू मॅग्नस कार्लसनला मात देत जगाला आश्चर्यचकित केले होते. एअरथिंग्ज मास्टर्स रॅपिड ऑनलाईन चेस टुर्नामेंटमध्ये त्याने ही कामगिरी केली. या पोस्टमधला उपरोध राजकीय लोकांवर तिरपा बाण मारतो आहे. चाहत्यांनीही मजेदार कमेंट्स करत खेर यांच्या पोस्टला उचलून धरले आहे.

दरम्यान गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय सत्तानाट्यावर आता पडदा पडलाय. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर कु वर मीम्सचा पाऊस पडला.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताना गर्दीत दिसणारे खास चेहरे हसवून जातात.

मीम्स म्हटल्यावर रजनीकांत नाही असे कसे होईल