वयाच्या 81 व्या वर्षी कशाला काम करताय? अमिताभ बच्चन प्रश्नावर संतापले, म्हणाले 'तुम्हाला काय...'

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.   

शिवराज यादव | Updated: Aug 18, 2024, 04:17 PM IST
वयाच्या 81 व्या वर्षी कशाला काम करताय? अमिताभ बच्चन प्रश्नावर संतापले, म्हणाले 'तुम्हाला काय...' title=

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. या वयातही अमिताभ बच्चन यांना केंद्रस्थानी ठेवत भूमिका लिहिल्या जातात. अमिताभ बच्चन या वयातही काम करत असल्याने एकीकडे आश्चर्य व्यक्त होत असताना, दुसरीकडे अनेकजण त्यांना आता विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. पण अमिताभ बच्चन मात्र नकार देतात. नुकतंच त्यांनी एक मोठी पोस्ट लिहीत आपण या वयातही काम का करतो याचं कारण सांगितलं. आपल्याकडे याचं उत्तर नाही, माझ्यासाठी ही आणखी एक संधी असते इतकंच सांगू शकतो असं अमिताभ म्हणाले आहेत. कोणाला याची समस्या आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली. 

त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "ते मला नेहमी सेटवर विचारणा करत असतात. तुम्ही मला काम का करत असता असं ते विचारत असतात. माझ्याकडे याचं उत्तर नाही. माझ्यासाठी ही दुसरी नोकरीची संधी असल्यासारखं आहे. याशिवाय आणखी काय कारण असू शकतं. इतरांकडे त्यांचं  स्वतःचे मूल्यांकन आहे. अनेकदा त्यांचे मॉडेल यशस्वी होण्यासाठी काम करावं लागतं. तुमच्याकडे तुमचे अंदाज लावण्याचं स्वातंत्र्य आहे आणि माझ्याकडे काम करण्याचं स्वातंत्र्य आहे". 

पुढे ते म्हणाले की, "माझं काम मला देण्यात आलं आहे. जेव्हा ते तुम्हाला देण्यात येईल तेव्हा त्याचं उत्तर द्या. माझी कारणं कदाचित तुम्हाला पटणार नाहीत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे अनेकांना बोलण्याची संधी मिळत असल्याने तुमचं ऐकलं जात आहे. तुम्ही बोललात आणि मी ऐकलं. मी काम कऱण्याचं कारण सांगितलं, हा मीच आहे. जे कारण आहे ते माझं आहे. बंद शटर आणि लॉक केलेलं". यावेळी त्यांनी मी या वयात काम करत असल्याची तुम्हाला समस्या आहे का? अशी विचारणाही केली. कामाला लागा आणि शोधा असा सल्लाही त्यांनी दिला. 

अमिताभ बच्चन पुन्हा एकदा 'कौन बनेगा करोडपती' (KBC) मध्ये होस्ट म्हणून झळकणार आहेत. कल्की 2898 AD मध्ये ते अखेरचे दिसले होते. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट हिंदू धर्मग्रंथांवर आधारित आहे. दीपिका पदुकोण, कमल हासन, प्रभास आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा भाग आहेत. 

याशिवाय अमिताभ बच्चन रजनीकांत यांचीही प्रमुख भूमिका असणाऱ्या वेट्टयानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये जगभरात रिलीज होणार आहे. या चित्रपटात फहद फासिल, राणा दग्गुबती, रितिका सिंग, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन आहेत. अनिरुद्ध रविचंदर या चित्रपटाचे संगीतकार आहेत.